Join us  

नेहा धुपियाने शेअर केला तिच्या मुलीचा पहिला फोटो... यासोबतच सगळ्यांना सांगितले तिचे नाव

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2018 1:02 PM

१८ नोव्हेंबरला मुंबईत नेहाने एका गोंडस मुलीला जन्म दिला. नेहाने नुकताच इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर तिच्या चिमुकलीचा फोटो पोस्ट केला आहे.

ठळक मुद्देया फोटोत आपल्याला तिच्या मुलीचा चेहरा पाहायला मिळत नाहीये. या मुलीचे चिमुकले पाय आपल्याला दिसत असून या फोटोसोबतच या चिमुकलीचे नाव काय आहे हे नेहाने सगळ्यांना सांगितले आहे.नेहाने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोसोबत लिहिले आहे की, मेहर धुपिया बेदी सगळ्यांना हाय करत आहे. नेहा आणि अंगदने त्यांच्या मुलीचे नाव मेहर ठेवले असून मेहरचा गोंडस चेहरा दिसेल असा फोटो नेहा कधी शेअर करणार याची तिचे फॅन्स आतुरतेने वाट पाहात आहेत. 

अभिनेत्री नेहा धूपिया आणि अभिनेता अंगद बेदी यांच्या घरी नुकताच एका गोंडस कन्यारत्नाचा जन्म झाला आहे. १८ नोव्हेंबरला मुंबईत नेहाने एका गोंडस मुलीला जन्म दिला. नेहाने नुकताच इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर तिच्या चिमुकलीचा फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत आपल्याला तिच्या मुलीचा चेहरा पाहायला मिळत नाहीये. या मुलीचे चिमुकले पाय आपल्याला दिसत असून या फोटोसोबतच या चिमुकलीचे नाव काय आहे हे नेहाने सगळ्यांना सांगितले आहे.

नेहाने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोसोबत लिहिले आहे की, मेहर धुपिया बेदी सगळ्यांना हाय करत आहे. नेहा आणि अंगदने त्यांच्या मुलीचे नाव मेहर ठेवले असून मेहरचा गोंडस चेहरा दिसेल असा फोटो नेहा कधी शेअर करणार याची तिचे फॅन्स आतुरतेने वाट पाहात आहेत. 

याचवर्षी १० मे रोजी नेहा धुपिया आणि अंगद बेदीचे लग्न झाले. लग्नाआधीच नेहा प्रेग्नंट होती. त्यामुळे दोघांनीही घाईघाईत लग्न उरकले. अर्थात यादरम्यान आपल्या प्रेग्नंसीची गोष्ट तिने जगापासून लपवून ठेवली होती. अखेर २४ आॅगस्टला नेहाने आपल्या बेबी बम्पचे फोटो शेअर करत प्रेग्नंसीची माहिती चाहत्यांसोबत शेअर केली होती. अंगद आणि नेहाने इतके महिने प्रेग्नंसी का लपवली, हे कळायला मार्ग नव्हता. पण  एका मुलाखतीदरम्यान नेहाने स्वत: यामागचे कारण सांगितले होते.

तिने म्हटले होते की, सुरुवातीला मी लोकांपासून जाणीवपूर्वक प्रेग्नंसीची गोष्ट लपवली. कारण लोकांची माझ्याबद्दलची वागणूक बदलेल की काय, अशी भीती मला होती. प्रोड्यूसर आणि डायरेक्टर मला काम देणे बंद तर करणार नाही, अशीही भीती मला होती. एक चांगली गोष्ट म्हणजे, सुरूवातीच्या सहा महिन्यांपर्यंत माझे बेबी बम्प दिसले नाही. याचा मला फायदा झाला. माझी एनर्जी लेवल खूप चांगली असल्याने मी यादरम्यान ‘हेलिकॉप्टर ईला’ आणि ‘स्टाईल्ड बाय नेहा’चे शूटींग संपवले. चार वर्षांपूर्वीच अंगदने नेहाला लग्नासाठी प्रपोज केले होते. पण तेव्हा नेहा दुसऱ्या रिलेशनशिपमध्ये होती. पण हे रिलेशनशिप तुटल्यानंतर नेहा आणि अंगद यांची जवळीक वाढली आणि दोघांनीही लग्नाचा निर्णय घेतला.

 

टॅग्स :नेहा धुपिया