Join us

नेहा-अंगदाच्या मुलीचा 'हा' क्यूट फोटो होतोय जबरदस्त व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2018 21:00 IST

नेहा धुपिया आणि अंगद बेदीने मे महिन्यात गुपचुप लग्न केले. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये नेहाने एका गोंडस मुलीला जन्म दिला. नेहा आणि अंगदने आपल्या मुलीचे नाव मेहर ठेवले.

ठळक मुद्देही दिवसांपूर्वी एका इंटरव्हु दरम्यान अंगदने नेहा लग्नाआधीच प्रेग्नेंट असल्याची कबुली दिली होतीचार वर्षांपूर्वीच अंगदने नेहाला लग्नासाठी प्रपोज केले होते

नेहा धुपिया आणि अंगद बेदीने मे महिन्यात गुपचुप लग्न केले. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये नेहाने एका गोंडस मुलीला जन्म दिला. नेहा आणि अंगदने आपल्या मुलीचे नाव मेहर ठेवले. नेहा धुपियाने इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक क्यूट फोटो शेअर केला आहे. ज्यात मेहर अंगदच्या अंगावर झोपलेली दिसतेय.  

 

 

नेहा लग्नाआधीच प्रेग्नंट होती. पण प्रेग्नंसीची गोष्ट तिने लपवून ठेवली होती. अखेर २४ आॅगस्टला नेहाने आपल्या बेबी बम्पचे फोटो शेअर करत प्रेग्नंसीची माहिती चाहत्यांसोबत शेअर केली होती. अंगद व नेहाने इतके महिने प्रेग्नंसी का लपवली, हे कळायला मार्ग नव्हता. पण  एका मुलाखतीदरम्यान नेहाने स्वत: यामागचे कारण सांगितले होते.  सुरूवातीला मी लोकांपासून जाणीवपूर्वक प्रेग्नंसीची गोष्ट लपवली. कारण लोकांची माझ्याबद्दलची वागणूक बदलेल की काय, अशी भीती मला होती. प्रोड्यूसर आणि डायरेक्टर मला काम देणे बंद तर करणार नाही, अशीही भीती मला होती. 

काही दिवसांपूर्वी एका इंटरव्हु दरम्यान अंगदने नेहा लग्नाआधीच प्रेग्नेंट असल्याची कबुली दिली होती.  चार वर्षांपूर्वीच अंगदने नेहाला लग्नासाठी प्रपोज केले होते. पण तेव्हा नेहा कुण्या दुस-यासोबत रिलेशनशिपमध्ये होती. पण हे रिलेशनशिप तुटल्यानंतर नेहा व अंगद यांची जवळीक वाढली आणि दोघांनीही लग्नाचा निर्णय घेतला. ज्येष्ठ क्रिकेटपटू बिशन सिंह बेदी यांचा मुलगा म्हणजेच अंगद बेदी याने क्रिकेट विश्वात स्वत:ची अशी एक वेगळी ओळख प्रस्थापित केली आहे. दिल्लीच्या रणजी संघाकडून सुरुवातीला काही वर्ष क्रिकेट खेळणा-या अंगदने त्यानंतर मॉडेलिंग आणि अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. रेमो डिसूझा दिग्दर्शित ‘फालतू’ या चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्याशिवाय  उंगली, पिंक, टायगर जिंदा है  या चित्रपटांतूनही तो झळकला होता. 

टॅग्स :नेहा धुपिया