Join us
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाच्या ३८ वर्षांनंतर असेच होणार...! नीतू सिंग यांनी शेअर केला मजेशीर फोटो!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2019 11:47 IST

गेल्या काही दिवसांपासून ऋषी कपूर अमेरिकेत उपचार घेत आहेत. नीतू सिंगही त्यांच्यासोबत आहेत. याचदरम्यान नीतू यांनी ऋषी कपूर यांच्यासोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे आणि हा फोटो वेगाने व्हायरल होतोय.

ठळक मुद्देफोटोत ऋषी कपूर आणि नीतू सिंग लंच करताना दिसत आहेत. याचदरम्यान नीतू यांनी सेल्फी घेण्याचा प्रयत्न केला. पण हे काय?  ऋषी कपूर आपल्या फोनमध्ये बिझी दिसलेत.

ऋषी कपूर यांची पत्नी आणि रणबीर कपूरची आई नीतू सिंग कपूर सोशल मीडियावर कमालीच्या अ‍ॅक्टिव्ह आहेत. रोज नव-नवे फोटो, पोस्ट शेअर करणाºया नीतू यांची खूप मोठी फॅन फॉलोर्इंग आहे. गेल्या काही दिवसांपासून ऋषी कपूर अमेरिकेत उपचार घेत आहेत. नीतू सिंगही त्यांच्यासोबत आहेत. याचदरम्यान नीतू यांनी ऋषी कपूर यांच्यासोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे आणि हा फोटो वेगाने व्हायरल होतोय. आता या फोटोत असे काय खास आहे? तर आहेच. फोटोपेक्षाही या फोटोला नीतू यांनी दिलेले कॅप्शन खास आहे.फोटोत ऋषी कपूर आणि नीतू सिंग लंच करताना दिसत आहेत. याचदरम्यान नीतू यांनी सेल्फी घेण्याचा प्रयत्न केला. पण हे काय?  ऋषी कपूर आपल्या फोनमध्ये बिझी दिसलेत. या सेल्फीला नीतू यांनी चांगलेच मजेशीर कॅप्शन देत शेअर केले. ‘लग्नाच्या ३८ वर्षांनंतर तुम्ही पतीसोबत लंच डेटवर जात असाल तर काहीसे असेच होणार. मी येथे सेल्फी घेण्याचा प्रयत्न करतेय आणि माझे पती फोनमध्ये बिझी आहेत,’ असे नीतू यांनी लिहिले आहे.

ऋषी कपूर गेल्या अनेक महिन्यांपासून अमेरिकेत उपचार घेत आहेत.   मध्यंतरी ऋषी कपूर यांनाही कॅन्सरने ग्रासल्याची चर्चा होती. अर्थात कपूर कुटुंबाने लगेच ही चर्चा निव्वळ अफवा असल्याचे सांगत या बातमीचे खंडन केले होते. पण अलीकडे  नीतू यांच्याच एका पोस्टनंतर पुन्हा एकदा ऋषी कपूर यांना कॅन्सर असल्याच्या चर्चेला उधाण आले होते.  

न्यु ईअर  सेलिब्रेशनचा एक फोटो नीतू सिंग यांनी आपल्या सोशल अकाऊंटवर शेअर केला होता. या फोटोला त्यांनी दिलेले कॅप्शन बरेच ‘सूचक’ होते.  ‘नवीन वर्षांचा काहीच संकल्प नाही. केवळ प्रदूषण कमी होऊ देत. आशा आहे की, भविष्यात ‘कॅन्सर’ हे फक्त एका राशीचेचं नाव असेल. गरिबी कमी होऊ आणि भरपूर प्रेम व सुदृढ आरोग्य लाभू दे...’, असे नीतू सिंग यांनी या फोटोला दिलेल्या कॅप्शनमध्ये लिहिले होते. नीतू सिंग यांची ही पोस्ट वाचून ऋषी कपूर यांना कॅन्सर तर नाही ना? असा प्रश्न पुन्हा एकदा चाहत्यांना पडला होता.

टॅग्स :नितू सिंगऋषी कपूररणबीर कपूर