Join us
Daily Top 2Weekly Top 5

सून माझी लाखात एक ! सासूबाई नीतू कपूर यांनी आलिया भटचं सर्वांसमोर अशा शब्दांत केलं कौतुक, म्हणाल्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2022 16:27 IST

मुलगा रणबीर कपूरच्या लग्नाचा आनंद नीतू कपूर यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे. सून आलिया भटवर त्यांचं विशेष प्रेम आहे.

मुलगा रणबीर कपूरच्या लग्नाचा आनंद नीतू कपूर यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे. सून आलिया भटवर त्यांचं विशेष प्रेम आहे. गेल्या काही दिवसांपासून ती सोशल मीडियावर आपल्या सुनेच्या कामाचे कौतुक करताना दिसत आहे तर कधी तिच्यासोबतचे सुंदर फोटो शेअर करत आहे. पुन्हा एकदा असेच काहीसे पाहायला मिळाले आहे.

नीतू कपूर सध्या डान्स दिवाने ज्युनियर या रिअॅलिटी शोमुळे चर्चेत आहे. लवकरच हा शो सुरू होणार आहे, याआधीही या शो शी संबंधित गोष्टी समोर येत असतात. अलीकडेच, गीत कौर बग्गा नावाच्या 8 वर्षांच्या मुलीने तिच्या अभिनयाने शोच्या जजची मनं जिंकली. सगळ्यात जास्त नीतू कपूर यांना या मुलीचा अभिनय आवडला. तिला पाहून नीतू कपूरला आलिया भटची आठवण झाली. म्हणाल्या, 'गीत, तू मला आलिया भटची आठवण करून देतोस. तू खूप गोंडस आहे'. नीतू कपूरचं त्यांच्या सुनेवर खूप प्रेम आहे. 

लग्नाआधी रणबीरच्या आईसोबत भावनिक चढ-उतारांमध्ये ती नेहमीच खंबीरित्या उभी राहिली, त्यामुळे ती कपूर कुटुंबाच्या खूप जवळ आली. डान्स दिवाने ज्युनियर्स हा नीतू कपूरचा टीव्हीवरील पहिला प्रोजेक्ट आहे. दिग्गज अभिनेत्री रिअॅलिटी शोमध्ये जज म्हणून पदार्पण करत आहे. हा शो 23 एप्रिलपासून टेलिकास्ट होणार आहे.  

टॅग्स :नितू सिंगआलिया भट