Join us

‘नीरजा’च्या परिवाराने निर्मात्यांना खेचले न्यायालयात!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2017 20:55 IST

धाडसी एयर होस्टेस दिवंगत नीरजा भनोट हिच्या परिवाराने ‘नीरजा’ चित्रपटाच्या निर्मात्यांवर न्यायालयात खटला दाखल केला आहे. गेल्या काही दिवसांपासून ...

धाडसी एयर होस्टेस दिवंगत नीरजा भनोट हिच्या परिवाराने ‘नीरजा’ चित्रपटाच्या निर्मात्यांवर न्यायालयात खटला दाखल केला आहे. गेल्या काही दिवसांपासून ‘नीरजा’च्या परिवाराकडून निर्मात्यांनी फसवणूक केल्याची तक्रार केली जात होती. अखेर त्यांना न्यायालयात खटला दाखल केल्याने निर्मात्यांना आता न्यायालयीन प्रक्रियेला सामोरे जावे लागणार आहे. नीरजा परिवाराच्या मते चित्रपट निर्मात्यांनी त्यांची योजनाबद्ध फसवणूक केली आहे. पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेनुसार, पूर्ण प्रकरण प्रतिवादी (ब्लिंग अनप्लग्ड) आणि फॉक्स स्टार स्टूडिओज् इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्यात झालेल्या योजनाबद्ध फसवणुकी संदर्भात आहेत. ज्यामध्ये परिवार आणि निर्मात्यांमध्ये सुनियोजित पद्धतीने समजोता करण्यात आला अन् नंतर चुकीचे पद्धतीने त्यांचा गैरफायदा घेऊन भनोट परिवाराची आर्थिक फसवणूक केली. दिवंगत रमा भनोट (नीरजाची आई) यांच्यात झालेल्या करारानुसार निर्मात्यांनी कुठलीही बाब न पाळता त्यांची फसवणूक केल्याचा दावाही भनोट परिवाराने केला आहे. वास्तविक, हे प्रकरण बºयाच दिवसांपासून सुरू आहे. त्यामुळे सुरुवातीला नीरजाचा परिवार आणि निर्मात्यांमध्ये यावर एकत्रितरीत्या चर्चा घडवून आणली गेली. मात्र या चर्चेत कुठल्याही प्रकारचे ठळक असे निष्पन्न झाले नसल्याने हे प्रकरण अखेर न्यायालयात पोहोचले आहे. आता असे म्हटले जात आहे की, या संपूर्ण प्रकरणाची सुनावणी जुलै महिन्यात होण्याची शक्यता आहे. दरम्यान, या प्रकरणामुळे ‘नीरजा’च्या निर्मात्यांच्या अडचणी वाढल्या असून, ते न्यायालयीन प्रक्रियेला कसे सामोरे जातील हे बघणे मजेशीर ठरेल. परिवाराच्या म्हणण्यानुसार, २०१३ मध्ये ‘नीरजा’च्या परिवारातील सदस्यांमध्ये आणि निर्मात्यांमध्ये चर्चा घडून आली होती. त्यानुसार निर्मात्यांना परिवारातील लोकांना साडेसात लाख रुपये कॅश अन् चित्रपटाच्या एकूण कमाईतील १० टक्के हिस्सा देणे अपेक्षित होते. मात्र असे झाले नाही. त्यामुळेच ‘नीरजा’च्या परिवारातील सदस्यांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर चांगली कमाई केली हाती. त्याचबरोबर चित्रपटाला याच वर्षी राष्ट्रीय पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले. नीरजा भनोट या धाडसी एयर होस्टेसने ५ सप्टेंबर १९८६ रोजी आतंकवाद्यांकडून अपहरण करण्यात आलेल्या विमानातून प्रवाशांची सुटका केली होती. यावेळी नीरजाला स्वत:चे प्राण गमवावे लागले. त्यावेळी तिचे वय केवळ २३ वर्ष इतकेच होते.