Join us
Daily Top 2Weekly Top 5

"मी चुकीच्या व्यक्तीला डेट केलं..", नीना गुप्ता यांनी दिली कबुली, म्हणाल्या- "मी मसाबाचं आयुष्य.."

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2023 10:58 IST

अभिनेत्री नीना गुप्ता त्यांच्या बिंधास्त स्वभावासाठी ओळखल्या जातात.

अभिनेत्री नीना गुप्ता (Neena Gupta) त्यांच्या बिंधास्त स्वभावासाठी ओळखल्या जातात. त्यांचे विचार आणि राहणीमान खूपच बोल्ड आहे. वयाच्या साठीतही त्या कोणतीच भूमिका करायला नाही म्हणत नाहीत. त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही त्या मोकळेपणाने बोलत. पुन्हा एकदा नीनाने तिच्या आयुष्यातील काही खुलासे केले आहेत. नीना यांनी कबूल केले की त्यांनी नेहमी चुकीच्या माणसाला डेट  केलं.

नीना गुप्ता यांचा जन्म ४ जून १९५९ रोजी झाला. 64 वर्षीय नीना यांनी दिल्ली विद्यापीठ आणि नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून शिक्षण घेतले आहे. आपल्या प्रत्येक भूमिकेच्या माध्यमातून एक वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या नीना यांना राष्ट्रीय पुरस्कार  उमटवली आहे. नीना गुप्ता वेस्ट इंडिजचे माजी क्रिकेटपटू विवियन रिचर्ड्ससोबत  रिलेशनशिपमध्ये होत्या.

नीना यांनी मुलाखतीदरम्यान पती विवेक मेहरा यांच्याबद्दल सांगितले की, 'जेव्हा मी माझ्या पतीला भेटले तेव्हा तो आधीच विवाहित होता आणि त्याला मुले होती, त्यामुळे खूप अडचणी आल्या. आम्ही कपल थेरपी घेतली.'' जेव्हा नीनाला नातेसंबंधांवर सल्ला द्यायला विचारण्यात आल्या तेव्हा त्या म्हणाल्या, ‘नात्यांवर सल्ला देणारी मी चुकीची व्यक्ती आहे. मी नेहमी चुकीच्या माणसाला डेट केले. कृपया मला विचारू नका.

यादरम्यान नीनाना यांनी त्यांची मुलगी मसाबा गुप्ताविषयीच्या भावना व्यक्त केल्या. त्या म्हणाला, 'माझ्याकडून चूक झाली होती. मसाबा जेव्हा मधु मंटेनासोबत रिलेशनशिपमध्ये होती तेव्हा तिला लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहायचे होते. पण मीच तिला लग्न करावं असं सांगितलं होतं. ही एक मोठी चूक होती. ते वेगळे झाले. 

टॅग्स :नीना गुप्ता