Join us
Daily Top 2Weekly Top 5

Neena Gupta : 'मी तर पब्लिक प्रॉपर्टीच आहे ना...' नेहरु सेंटरमध्ये फिरताना नीना गुप्ता यांनी शेअर केला व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2023 15:57 IST

अभिनेत्री नीना गुप्ता अनेकदा असं काहीतरी बोलतात की हसून हसून पुरेवाट होते. आता त्या भडकल्या आहेत की नाही हे तुम्हीच व्हिडिओ बघून ठरवा

Neena Gupta : बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता यांचा साधा सरळ स्वभाव अनेकांना भावतो. ६३ व्या वर्षीही त्यांचा फिटनेस पाहून भलेभले चक्रावतात. त्यांनी नुकताच एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. मुंबईतील नेहरु सेंटरमध्ये त्यांनी इंडियन आर्ट फेस्टिव्हलला भेट दिली. या आर्ट गॅलरीत फेरफटका मारतानाचा व्हिडिओ त्यांनी पोस्ट केला आहे. आता सेलिब्रिटी म्हणलं की लोक फोटो काढणारच. पण त्यांचे फोटो काढणाऱ्यांवर नीना गुप्ता यांनी वेगळीच टिप्पणी केली आहे. 

नीना गुप्ता आर्ट गॅलरीत फिरत असताना आजुबाजुचे लोक त्यांचे फोटो काढत होते. यावर त्या म्हणतात, 'लोक माझी परवानगी न घेताच फोटो काढत आहेत. मी पब्लिक प्रॉपर्टीच आहे ना हो आहे मी.'

नीना गुप्ता यांच्या या व्हिडिओवर चाहते मात्र त्यांचं कौतुकच करत आहेत. तुम्ही किती साध्या आहात, किती सुंदर दिसत आहात अशा कमेंट्स त्यांच्या व्हिडिओखाली येत आहेत.

नीना गुप्ता सध्या सिनेमा आणि वेब सिरीज दोन्ही क्षेत्रात अॅक्टीव्ह आहेत. नुकतेच त्यांना पंचायत वेब सिरीज मधील भूमिकेसाठी ओटीटी फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला. तर त्यांचे गुडबाय आणि ऊॅंचाई हे दोन्ही सिनेमे हिट झाले.

टॅग्स :सोशल मीडियानीना गुप्ताइन्स्टाग्राम