Join us

नवाझुद्दीन सिद्दीकीच्या पत्नीने त्यांच्या नात्याविषयी केला खळबळजनक खुलासा, वाचून तुम्हाला देखील बसेल धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2020 16:52 IST

आलियाने आता त्यांच्या नात्याविषयी एक खळबळजनक खुलासा केला आहे.

ठळक मुद्देआलियाने नवाझुद्दीनला नुकतीच घटस्फोटाची नोटिस पाठवली असली तरी ते दोघे जवळजवळ चार-पाच वर्षांपासून वेगळे राहात असल्याचे आलियाने मीडियाला सांगितले आहे.

बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी सध्या त्याच्या खासगी आयुष्यामुळे खूप चर्चेत आला आहे. नुकतेच त्याचे घटस्फोटाचे वृत्त समोर आले आहे. नवाजुद्दीन सिद्दीकीची पत्नी आलियाने त्याला व्हॉट्सअ‍ॅप आणि ईमेलवर घटस्फोटाची नोटिस पाठवून सगळ्यांना चकीत केले आहे. आलियाने आता त्यांच्या नात्याविषयी एक खळबळजनक खुलासा केला आहे.

आलियाने नवाझुद्दीनला नुकतीच घटस्फोटाची नोटिस पाठवली असली तरी ते दोघे जवळजवळ चार-पाच वर्षांपासून वेगळे राहात असल्याचे आलियाने मीडियाला सांगितले आहे. आलियाने एबीपी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे की, लग्न झाल्यापासूनच माझ्यात आणि नवाजमध्ये सगळे काही सुरळीत सुरू नाहीये. महिलांचा आदर कसा करायचा हे नवाज आणि त्यांच्या भावांना माहीतच नाहीये. आम्ही कधीही आमची भांडणं सोडवायला गेलो तर मी कशाप्रकारे चुकीची आहे हेच मला केवळ सांगितलं जायचं. त्याने मला अनेकवेळा लोकांसमोर अपमानास्पद वागणूक दिली आहे. लोकांशी कशाप्रकारे वागायचे हे तुला माहीत नसेल तर तू गप्पच बसत जा... असे तो मला सुनवायचा. पत्नीला पतीने जो आदर देणे गरजेचा आहे, तो आदर मला कधीच मिळाला नाही. 

तिने पुढे सांगितले की, घटस्फोटाची मी नोटिस पाठवायच्या चार-पाच वर्षं आधीपासून आम्ही वेगळे राहात आहोत. नवाझुद्दीन यारी रोड येथील त्याच्या ऑफिसमध्ये राहायचा. पण तो अनेकवेळा घरी येत असल्याने आमच्यात काही प्रॉब्लेम सुरू आहे याचा अंदाज कोणालाच आला नाही.

नवाजुद्दीन सिद्दीकी आणि आलिया यांच्या लग्नाला जवळपास दहा वर्षे झाले आहे. दहा वर्षानंतर आलियाने नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत वेगळा होण्याचा निर्णय घेतला. आलियाचा दावा आहे की नवाज तिची व तिच्या मुलांची काळजी घेत नाही. त्यांच्या नात्यात अनेक प्रॉब्लेम असल्याने हे नाते आणखीन ताणण्यापेक्षा संपवण्यासाठी मी लाचार झाले. आलियाने नवाजुद्दीन सिद्दीकीला घटस्फोटाची नोटिस पाठवली असली तरी आतापर्यंत त्यावर उत्तर आलेले नाहीये.

टॅग्स :नवाझुद्दीन सिद्दीकी