Join us

नवाजुद्दीन सिद्दीकीची पत्नी पडली प्रेमात?, आलिया सिद्दीकीनं मिस्ट्री मॅनसोबतचा फोटो केला शेअर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2023 10:19 IST

Aaliya Siddiqui And Mystery Man Photo : नवाजुद्दीन सिद्दीकीची पत्नी आलिया सिद्दीकीने मिस्ट्री मॅनसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. यासोबतच आलिया सिद्दीकीने एक पोस्टही लिहिली आहे.

बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) त्याची पत्नी आलिया सिद्दीकी(Aaliya Siddiqui)सोबत अनेक दिवसांपासून वाद सुरु आहेत. त्यामुळे दोघेही सतत चर्चेत होते. नवाजुद्दीन सिद्दीकी आणि आलिया सिद्दीकी यांच्यातील भांडण इतके वाढले की ते घटस्फोटापर्यंत पोहोचले. दरम्यान, आलिया सिद्दीकी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. वास्तविक, आलिया सिद्दीकी एका मिस्ट्री मॅनसोबत दिसली होती. आता आलिया सिद्दीकीने स्वतः या मिस्ट्री मॅनसोबतचा एक फोटो शेअर करून तिच्या नात्याबद्दल पोस्ट शेअर केली आहे.

आलिया सिद्दीकीने सोमवारी तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला ज्यामध्ये ती मिस्ट्री मॅनसोबत दिसत आहे. आलिया सिद्दीकीने या फोटोसोबत लिहिले की, 'मी ज्या नात्याला जपत होते त्यातून बाहेर पडण्यासाठी मला १९ वर्षे लागली. पण माझ्या आयुष्यात माझी मुलं हीच माझी प्राथमिकता आहे. तो नेहमीच होता आणि राहील. मात्र, काही नाती अशी असतात की जी मैत्रीच्या पलीकडे जातात आणि हे नाते असतेच. मला याचा खूप आनंद झाला आहे, म्हणून मी माझा आनंद तुम्हा सर्वांसोबत शेअर करत आहे. मला आनंदी राहण्याचा अधिकार नाही का?'

आलिया सिद्दिकीने 'ईटाईम्स'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, 'मी पुढे गेले आहे आणि माझे नाते मैत्रीपेक्षा जास्त आहे. आमच्यात बांधिलकी नाही असे नाही. माझे स्वतःचे जीवन आहे, जे मला माझ्या मुलांसोबत जगायचे आहे आणि मला माझ्या मुलांना कोणतीही समस्या द्यायची नाही. पण ते आदराचे नाते आहे. ही फक्त वेळेची बाब आहे. ही एक सवय आहे, तुम्ही काही चांगले केले तरी लोक तुमच्याबद्दल वाईट बोलतील. 

कोण आहे हा मिस्ट्री मॅन ?मिस्ट्री मॅनबद्दल बोलताना आलिया सिद्दीकी म्हणाली, 'मी त्याच्या बुद्धिमत्तेने खूप प्रभावित झाले आहे. पैसा तुम्हाला आनंद देऊ शकत नाही पण व्यक्ती आनंद देतो. तो माझा खूप आदर करतो आणि माझी खूप काळजी घेतो. तो भारताचा नसून इटलीचा आहे आणि आम्ही दुबईत भेटलो. आम्ही बरेच दिवस मित्र होतो पण मला त्याला ओळखायला थोडा जास्त वेळ लागला.' मात्र, आलिया सिद्दीकीने या मिस्ट्री मॅनचे नाव उघड केलेले नाही.

टॅग्स :नवाझुद्दीन सिद्दीकी