Join us

नवाजुद्दीन सिद्दिकीच्या ‘हरामखोर’चा ट्रेलर रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2016 22:09 IST

Trailer of Nawazuddin's 'Haraamkhor' released ; हरामखोरची सॅन्सॉर बोर्डाच्या कचाटयातून मुक्तता झाल्यावर या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. या चित्रपटाला सॅन्सॉर बोर्डाने यू/ए असे प्रमाणपत्र दिले आहे.

अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी व श्वेता त्रिपाठी यांच्या मुख्य भूमिका असलेल्या हरामखोरची सॅन्सॉर बोर्डाच्या कचाटयातून मुक्तता झाल्यावर या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. या चित्रपटाला सॅन्सॉर बोर्डाने यू/ए असे प्रमाणपत्र दिले आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर रिलीज करण्यात आले होते. श्लोक शर्मा दिग्दर्शित  हरमाखोर हा चित्रपट गुनीत मोंगा प्रोडक्शन बॅनर सिख्या एंटरटेनमेंट यांच्या बॅनरखाली तयार करण्यात आला आहे. या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी आणि श्वेता त्रिपाठी यांच्या मुख्य भूमिका आहेत. चित्रपटाच्या शूटिंगपासूनच ‘हरामखोर’वादाच्या भोवºयात अडकलाय. विशेष म्हणजे या चित्रपटाचे शूटिंग केवळ १६ दिवसात पूर्ण  करण्यात आले आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये नवाजुद्दीन सिद्दिकी शिक्षकाच्या भूमिकेत दिसत असून तो मुलांना शिकवित असताना दिसतोय. ट्रेलरमधील दृश्ये वयात येणाºया मुलांच्या हालचाली व त्यांच्या सवयींचा उलगडा करणारी आहे. ट्रेलरमधून चित्रपटांची क था दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ट्रेलर पाहून चित्रपटाविषयी थोडी फार माहिती जाणून घेता येऊ शकते. हा चित्रपट नवाजुद्दीन सिद्दीकी आणि श्वेता त्रिपाठी या शिक्षक-विद्यार्थिनीच्या रोमान्सवर आधारित हा चित्रपट आहे.एप्रिल २०१५ मध्ये दिग्दर्शक श्लोक शर्मा यांच्याविरूद्ध बालभारती महाराष्ट्र पाठ्यपुस्तक मंडळाने एक तक्रार दाखल केली होती. 'हरामखोर' चित्रपटातील लोगो आणि प्रमोशन सीन्स वर मंडळाने आक्षेप घेतला होता. ‘१५व्या वार्षिक न्यूयॉर्क भारतीय चित्रपट महोत्सव’ आणि लॉस एंजलिस येथील भारतीय चित्रपट महोत्सवातही ‘हरामखोर’ चे स्क्रिनिंग करण्यात आले होते. या चित्रपटासाठी नवाजला ‘न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हल’ मध्ये बेस्ट अ‍ॅक्टरचा किताबही मिळाला आहे.