Join us

नवाजुद्दीन सिद्दीकीवर पत्नी आलियाने केले गंभीर आरोप, म्हणाली- मी जेव्हा गर्भवती होतो, तेव्हा हा गर्लफ्रेंडसोबत..

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2020 16:12 IST

आम्ही लग्नाआधी आणि नंतर खूप भांडत होतो.

बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे.अलीकडेच नवाजची पत्नी आलियाने त्याला घटस्फोटाची नोटीस पाठविली. यासह आलिया सिद्दीकीने नवाजच्या कुटुंबीयांवर अत्याचार केल्याचा आरोप केला आहे.

एबीपी न्यूजच्या रिपोर्टनुसार एका मुलाखती दरम्यान आलिया म्हणाली, 2003 पासून मी नवाजुद्दीन सिद्दीकीला ओळखते. आम्ही एकत्र राहू लागलो. त्याचा भाऊ शामसही आमच्याबरोबर राहायचा. मग, हळूहळू आम्ही प्रेमात पडलो. मग आम्ही लग्न केलं. सुरुवातीपासूनच आमच्यामध्ये काही समस्या होत्या. मला वाटले की हे थांबेल 15 ते 16  वर्षे झाली आणि अत्याचार थांबले नाही.''

आलिया म्हणाली, “जेव्हा आम्ही एकमेकांना डेट करत होतो आणि लग्न करणार होतो तेव्हा मला ते चांगले आठवते, तो आधीपासूनच रिलेशनशीपमध्ये होता. आम्ही लग्नाआधी आणि नंतर खूप भांडत होतो. मी जेव्हा गर्भवती होतो तेव्हा मी डॉक्टरकडे चेकअपसाठी स्वत: गाडी चालवत जायचे. माझे डॉक्टर मला म्हणायचे की, मी वेडी महिला आहे जी प्रसूतीसाठी एकटी आली आहे. जेव्हा माझे लेबर पेन सुरु झाले तेव्हा नवाज त्याच्या आईवडिलांच्या इथे होता. पण जेव्हा मला त्रास होत होता तेव्हा माझे पती माझ्याबरोबर नव्हते. तो आपल्या गर्लफ्रेंडशी फोनवर बोलत असायचा. मला याबद्दल सर्व काही माहित होते,  कारण फोन बिलाचे स्टेटमेंट यायचे. ''

टॅग्स :नवाझुद्दीन सिद्दीकी