Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुलीसाठी नवाजुद्दीनने घेतला इतका मोठा निर्णय, चाहत्यांची होऊ शकते निराशा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2019 08:00 IST

नवाजुद्दीन सिद्दिकी याची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. नुकताच तो ‘सेक्रेड गेम्स 20’ या वेबसीरिजमध्ये झळकला. त्याने साकारलेला गणेश गायतोंडे चांगलाच भाव खावून गेला. पण आता नवाजुद्दीनच्या चाहत्यांची निराशा करणारी एक बातमी आहे.

ठळक मुद्देसध्या बॉलिवूडमध्ये बायोपिकची चलती आहे, यावरही तो बोलला.

नवाजुद्दीन सिद्दिकी याची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. नुकताच तो ‘सेक्रेड गेम्स 20’ या वेबसीरिजमध्ये झळकला. त्याने साकारलेला गणेश गायतोंडे चांगलाच भाव खावून गेला. पण आता नवाजुद्दीनच्या चाहत्यांची निराशा करणारी एक बातमी आहे. होय, पुढील दोन वर्षे तरी नवाजुद्दीन वेबसीरिजमध्ये दिसायचा नाही. होय, दोन वर्षे वेबसीरिजपासून दूर राहण्याचा निर्णय नवाजुद्दीनने म्हणे घेतलाय. याचे कारण म्हणजे, नवाजुद्दीनची मुलगी. मुलीखातर यापुढे ‘सेक्रेड गेम्स’चा गणेश गायतोंडे किंवा ‘गँग ऑफ वासेपूर’च्या फैजल खानसारख्या भूमिका करण्याचा निर्णय नवाजुद्दीनने घेतला आहे.

दैनिक भास्करशी बोलताना नवाजुद्दीनने खुद्द या निर्णयाची माहिती दिली.  फैजल खान व गणेश गायतोंडे या भूमिकांनी मला मोठे यश दिले. आजही मला अशा भूमिकांच्या ऑफर्स येतात. पण सध्या तरी मला अशा भूमिका करायच्या नाहीत. या भूमिकांनी माझी एकप्रकारची इमेज तयार केली. माझी मुलगी सध्या खूप लहान आहे. अशा इमेजचे माझे सिनेमे मी माझ्या मुलीला दाखवू इच्छित नाही. त्यामुळे तूर्तास तरी मी अशा भूमिकांपासून दूर राहणार आहे. यापेक्षा रोमॅन्टिक कॉमेडी चित्रपटांवर माझा भर असेल, असे नवाजुद्दीन म्हणाला. 

सध्या बॉलिवूडमध्ये बायोपिकची चलती आहे, यावरही तो बोलला. बायोपिकला सध्या चांगले दिवस आहेत, हे मला ठाऊक आहे. पण यशस्वी लोकांचे बायोपिक करण्यात मला काहीही रस नाही. त्यापेक्षा अपयशी लोकांचे बायोपिक करायला मला आवडेल. अनेक लोक संघर्ष करतात, त्यांना यश मिळत नाही, त्यांची कथा जगापुढे यायला हवी. सद्यस्थितीत ज्या प्रकारचे बायोपिक बनत आहेत, ते पाहून मला आश्चर्य वाटते, असे तो म्हणाला.

टॅग्स :नवाझुद्दीन सिद्दीकी