Join us

नवाजुद्दीन सिद्दीकीच्या ‘बाबूमोशाय बंदूकबाज’चे ‘बर्फानी’ गाणे रिलीज; बोल्ड सीन्सचे पहा हायलाइट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2017 19:50 IST

​अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याच्या आगामी ‘बाबूमोशाय बंदूकबाज’ या बहुचर्चित चित्रपटाचे पहिले गाणे ‘बर्फानी’ आज रिलीज करण्यात आले आहे.

अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याच्या आगामी ‘बाबूमोशाय बंदूकबाज’ या बहुचर्चित चित्रपटाचे पहिले गाणे ‘बर्फानी’ आज रिलीज करण्यात आले आहे. गाण्यात नवाजुद्दीनचे बदललेले रूप तुम्हाला बघायला मिळेल. कारण गाण्यात नवाज आणि बिदिता बाग यांच्यातील लव्ह मेकिंग सीन्स आग लावणारे असून, नवाजचा हा बदललेला अवतार थक्क करणारा आहे. वास्तविक जेव्हा या चित्रपटाचे ट्रेलर रिलीज करण्यात आले होते, तेव्हापासून नवाज आणि बिदितामधील लव्ह मेकिंग सीन्स चर्चेत आले होते. दोघांमधील केमिस्ट्री बघण्यासारखी असल्याने हे सीन्स चांगलेच रंगात आल्याचे दिसून येतात. दरम्यान, ‘बर्फानी’ हे गाणे ऐकावयास खूपच मधुर असून, त्यास संगीतकार गौरव दागोवन्कर यांनी कंपोज केले आहे. त्याचबरोबर गाण्याचे बोल गालिब असद भोपाली यांचे आहेत, तर गाण्याला अरमान मलिकचा आवाज आहे. हे गाणे नवाज याने त्याच्या सोशल अकाउंटवर शेअर करताना लिहिले की, ‘जेव्हा बाबू रोमान्स करतो तेव्हा तुम्ही त्यास मिस करू शकत नाही. बर्फानीबरोबर हवेतील प्रेमाचा स्पर्श जाणवू द्या!’ त्याचबरोबर त्याने आणखी एका ट्विटमध्ये म्हटले की, ‘रोमान्स मे हम भी किसीसे कम नही!’या चित्रपटातील नवाजचा अंदाज ‘गॅँग्स आॅफ वासेपुर’ या चित्रपटातील भूमिकेशी साम्य साधणारा आहे. त्याचबरोबर बंगाली अभिनेत्री बिदिता बाग नवाजुद्दीनसोबत बॉलिवूडमध्ये या चित्रपटातून डेब्यू करीत आहे. खरं तर या भूमिकेसाठी सुरुवातीला चित्रांगदा सिंग हिला विचारणा करण्यात आली होती; मात्र तिने याकरिता नकार दिला. त्यानंतर बिदिताच्या नावाचा विचार केला गेला. बिदितासोबतच्या लव्ह मेकिंग सीन्सविषयी बोलताना नवाजने म्हटले होते की, हे सीन्स देताना खूपच अनकम्फर्टेबल वाटायचे. गेल्या आठवड्यातच नवाजचा ‘मुन्ना मायकल’ या चित्रपट रिलीज झाला आहे. या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर फारसा करिष्मा दाखविलेला नाही; मात्र नवाजची भूमिका प्रेक्षकांकडून चांगलीच पसंत केली जात आहे. कारण नॉन डान्सर असताना त्याने चित्रपटात लावलेले ठुमके कौतुकास्पद ठरत आहेत. त्यामुळेच टायगर श्रॉफपेक्षा नवाजचे कॅरेक्टर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहे. आता नवाज पुन्हा एकदा ‘बाबूमोशाय बंदूकबाज’ या चित्रपटातून अतिशय हटके भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. प्रेक्षक याला कसा प्रतिसाद देतील, हे बघणे मजेशीर ठरेल. दरम्यान, नवाजला या चित्रपटातून प्रचंड अपेक्षा आहेत.