Join us
Daily Top 2Weekly Top 5

नवाजुद्दीन सिद्दीकी आणि सान्या मल्होत्राचा हा 'फोटोग्राफ' होतोय व्हायरल, वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2019 16:34 IST

नवाजुद्दीन सिद्दीकी आणि सान्या मल्होत्रा फोटोग्राफ सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बर्लिन फिल्म फेस्टिव्हलमध्ये देखील दाखवला जाणार आहे.

ठळक मुद्देरितेश बत्रा यांचा हा सिनेमा धारावीमधल्या एका फोटोग्राफरवर आधारित आहे.नवाज रितेश बत्रांसोबत दुसऱ्यांदा काम करतोय तर सान्या पहिल्यांदाच

नवाजुद्दीन सिद्दीकी आणि सान्या मल्होत्रा फोटोग्राफ सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा सिनेमा 23 जानेवारी ते 2 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या सनडान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये या सिनेमाचे वर्ल्ड प्रीमियर होणार आहे. तसेच बर्लिन फिल्म फेस्टिव्हलमध्ये देखील दाखवला जाणार आहे.  

रितेश बत्रा यांचा हा सिनेमा धारावीमधल्या एका फोटोग्राफरवर आधारित आहे. नवाज रितेश बत्रांसोबत दुसऱ्यांदा काम करतोय तर सान्या पहिल्यांदाच.  सान्या मल्होत्रा म्हणाली होती की, ''फोटोग्राफ'मध्ये नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत काम करणे माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. कारण नवाजुद्‌दीन हा माझा आवडता अभिनेता असल्याने त्याच्यासोबत काम करण्याचे माझे स्वप्न पूर्ण होत आहे.' पुढे ती म्हणाली, चित्रपटाची शुटिंग सुरू झाल्यानंतर सुरूवातीला मी थोडी नर्व्हस होते. पण, त्यानंतर मी त्यांचे सर्व इंटव्यू पाहिले. त्यात ते कशा प्रकारे आपली भूमिका साकारतात, याचे निरिक्षण केले. त्यामुळे मला त्यांच्यासोबत काम करताना थोडा आत्मविश्‍वास मिळाला, असे तिने सांगितले.  सान्या मल्होत्रा व नवाजुद्दीन सिद्दीकीच्या भूमिकेबद्दल अद्याप काहीही समजू शकलेले नाही. मात्र त्यांची केमिस्ट्री रुपेरी पडद्यावर कशी वाटते, हे पाहणे कमालीचे ठरणार आहे. भारतात तो 8 मार्चला हा सिनेमा रिलीज होणार आहे. 

नवाजने नुकतेच पेटा सिनेमातून साऊथमध्ये डेब्यू केला आहे. नवाजने यात व्हिलनची भूमिका साकारली आहे. तर सान्या आयुष्यमानसोबत बधाई हो सिनेमात दिसली होती. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमावला होता. 

टॅग्स :नवाझुद्दीन सिद्दीकीसान्या मल्होत्रा