Join us
Daily Top 2Weekly Top 5

नवाजुद्दीन सिद्दीकी व राधिका आपटे पुन्हा एकत्र दिसणार ह्या सिनेमात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2018 08:00 IST

हनी त्रेहानच्या 'रात अकेली है' सिनेमात काम करण्यास नवाजुद्दीन सिद्दीकीने होकार दिला असून त्याच्यासोबत या सिनेमात राधिका आपटे मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

ठळक मुद्दे 'रात अकेली है' चित्रपट भारतातील प्रेमकथेवर आधारीत राधिका आपटे व नवाजुद्दीन सिद्दीकी दिसणार मुख्य भूमिकेत

अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी 'सेक्रेड गेम्स' या वेबसीरिजमधून खूप लोकप्रिय झाला असून या सीरिजच्या दुसऱ्या भागाची वाट प्रेक्षक पाहत आहे. त्यात तो सध्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारीत चित्रपटाच्या कामात व्यग्र आहे. या सिनेमात तो बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमानंतर नवाज एका चांगल्या स्क्रीप्टच्या शोधात होता. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे हनी त्रेहान लवकरच एका सिनेमातून दिग्दर्शनात पदार्पण करणार आहे. 'रात अकेली है' असे या सिनेमाचे नाव असून यात नवाजुद्दीन सिद्दीकीने या सिनेमात काम करण्यास होकार दिला आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री राधिका आपटे प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.मुंबई मिररच्या रिपोर्टनुसार, हनी त्रेहानचे दिग्दर्शनात पदार्पण असलेला सिनेमा 'रात अकेली है'त काम करण्यास नवाजुद्दीनने हिरवा कंदील दिला आहे. या चित्रपटात राधिका आपटेदेखील असणार आहे. राधिका हनी त्रेहानची खूप चांगली मैत्रिण आहे. कास्टिंग डिरेक्टर ते आता दिग्दर्शक बनणाऱ्या हनी त्रेहानने विशाल भारद्वाजच्या 'मकबूल', 'ओमकारा' व '7 खून माफ' सिनेमात सहाय्यक म्हणून काम केलेले आहे.राधिका आपटे व नवाजुद्दीन सिद्दीकीचा हा तिसरा सिनेमा अाहे. यापूर्वी त्यांनी श्रीराम राघवन यांच्या बदलापूर व मांझी - द माऊंटन मॅनमध्ये काम केले आहे. 'रात अकेली है'शी निगडीत सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, 'रात अकेली है' चित्रपट भारतातील प्रेमकथेवर आधारीत असून या चित्रपटातील नायिकेच्या हनी त्रेहान शोधात होते. पण, नंतर त्यांना राधिका या रोलसाठी योग्य वाटली.राधिका व हनी बऱ्याच वर्षांपासून एकमेकांना ओळखतात व ते चांगले मित्र आहेत. राधिकालादेखील या सिनेमाची स्क्रीप्ट अावडली असून तिनेदेखील या सिनेमात काम करण्यास होकार दिला आहे. या चित्रपटाच्या शूटिंगला जानेवारीत सुरूवात होणार आहे. सध्या हनी त्रेहान प्रीप्रोडक्शनच्या कामात व्यग्र आहे.

टॅग्स :नवाझुद्दीन सिद्दीकीराधिका आपटे