Join us

​फिल्म इंडस्ट्रीत धर्मभेद पाळला जात नाही- नवाजुद्दीन !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2016 14:47 IST

भारतीय फिल्म इंडस्ट्रीत केवळ प्रतिभेच्या जोरावरच व्यक्तिची पारख होत असून येथे धर्मभेद पाळला जात नसल्याचे नवाजुद्दीन सिद्दीकीने एका मुलाखतीत ...

भारतीय फिल्म इंडस्ट्रीत केवळ प्रतिभेच्या जोरावरच व्यक्तिची पारख होत असून येथे धर्मभेद पाळला जात नसल्याचे नवाजुद्दीन सिद्दीकीने एका मुलाखतीत सांगितले.  ‘व्यक्तीमध्ये प्रतिभा असणे आवश्यक आहे. अर्थात याला थोडा वेळ लागतो पण तुम्हाला त्याचे फळ मिळते. मी या उद्योगाचा भाग असल्याचे आभार मानतो,’ असेही नवाजुद्दीन म्हणाला.‘ माझे काम खूप मेहनत करणे हे आहे आणि मी ते प्रामाणिकपणे करीत असतो. ही माज्या हातातील गोष्ट आहे. मी सर्वात चांगला परफॉर्मन्स देण्याचा प्रयत्न करीत असतो,’ असेही तो म्हणाला.नवाजुद्दीन सध्या त्याच्या आगामी 'फ्रीकी अली' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये मग्न आहे.