Join us
Daily Top 2Weekly Top 5

​नवाजुद्दीनने रणवीरला दिले ‘चड्ढी चॅलेंज’

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2016 22:29 IST

‘फ्रीकी अली’मधील नवाजुद्दीन सिद्दीकीचा चड्ढीवाला डायलॉग चांगलाच लोकप्रीय झाला आहे.  सलमान खाननेही हा डायलॉग बोलण्याची हिंमत केली नाही. नवाजुद्दीनने ...

‘फ्रीकी अली’मधील नवाजुद्दीन सिद्दीकीचा चड्ढीवाला डायलॉग चांगलाच लोकप्रीय झाला आहे.  सलमान खाननेही हा डायलॉग बोलण्याची हिंमत केली नाही. नवाजुद्दीनने आता रणवीर सिंहला हा डायलॉग बोलून दाखवण्याचे चॅलेंज दिले आहे.   नवाजच्या मते, हा एक मिनिटाचा वनटेक डायलॉग केवळ रणवीरच म्हणू शकतो. त्यामुळे त्याने रणवीरलाच हे चॅलेंज दिले आहे. खुद्द नवाजने सुद्धा बंद खोलीत अनेकदा प्रॅक्टिस केल्यानंतर वनटेकमध्ये हा डायलॉग पूर्ण केला होता. नवाजला हा डायलॉग एका टेकमध्ये म्हणताना पाहून सलमानचे तर डोळेच फिरले होते. मला जर हा डायलॉग बोलायला सांगितला तर मी तो पन्नास टेकमध्येही म्हणू शकणार नाही, असे सलमान तेव्हा म्हणाला होता. आता रणवीर  हे चॅलेंज कसे पार पाडतो, ते बघूयात!