Join us

नवाज-श्रीदेवी दिसणार एकत्र!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2016 22:15 IST

गौरी शिंदे यांच्या ‘इंग्लिश विंग्लिश’ मध्ये श्रीदेवी हिने उत्तम अभिनय साकारला होता. आता जवळपास चार वर्षांनंतर तिने नवाजुद्दीन सिद्दीकी ...

गौरी शिंदे यांच्या ‘इंग्लिश विंग्लिश’ मध्ये श्रीदेवी हिने उत्तम अभिनय साकारला होता. आता जवळपास चार वर्षांनंतर तिने नवाजुद्दीन सिद्दीकी सोबत तिने कमबॅक केले आहे. सध्या या चित्रपटाचे नाव ‘मॉम’ असे ठरले असून चित्रपटाचे निर्माते तिचे पती बोनी कपूर हेच असणार आहेत. नवाजुद्दीन सिद्दीकी म्हणतात की,‘ मी दहा दिवसांपूर्वी एक चित्रपट साईन केला आहे. चित्रपटाची थ्रिलर स्क्रिप्ट वाचून मी झपाटलो गेलो आहे. माझे बरेच सीन्स यात श्रीदेवींसोबत असणार आहेत. माझ्या मते, देशातील सर्वांत बेस्ट अभिनेत्री श्रीदेवी आहे. मी त्यांचे अनेक चित्रपट पाहिले आहेत. ‘सदमा’ आणि ‘चांदणी’ हे माझे फेव्हरेट आहेत. मी अद्याप तिला भेटलो नाही पण लवकरच भेटेल. ’