Join us

नवाजला चाहते सोशल मीडियावर संबोधतात 'या' नावाने

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2018 06:00 IST

नवाजने आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉ़लिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे.

ठळक मुद्देआगामी काळात नवाजुद्दीन साकारणार वेगवेगळ्या भूमिका

बॉलिवूडमध्ये विविध भूमिका सक्षमपणे बजावून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीची नुकतीच सेक्रेड गेम्स ही वेब सीरिज प्रदर्शित झाली. या वेब सीरिजमध्ये त्याने गणेश गायतोंडे नामक गँगस्टरची भूमिका साकारली आहे. त्याने साकारलेली ही भूमिका ग्रे शेडची असून त्याच्या अभिनयाचे सगळीकडून खूप कौतूक होत आहे. 

नवाज एखादी भूमिका छोटी आहे की मोठी हे पाहत नाही. तो प्रत्येक भूमिकेला शंभर टक्के न्याय देण्याचा प्रयत्न करतो. सरफरोश सिनेमात त्याची भूमिका फक्त दोन मिनिटांची होती. तरीदेखील ही भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात राहिली. गँग्स ऑफ वासेपूर चित्रपट असो किंवा मांझी या चित्रपटात त्याने मुख्य भूमिका साकारली होती. या त्याच्या भूमिका प्रेक्षकांना खूपच भावल्या. नुकतीच त्याची दाखल झालेली वेब सीरिज सेक्रेड गेम्सने सिद्ध केले आहे की त्याच्यासारखी भूमिका कोणी इतर कलाकार करू शकत नाही. नवाजने आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉ़लिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. तसेच त्याचे कोटी चाहते आहेत. त्याच्या चाहत्यांनी त्याला गॉड ऑफ अॅक्टिंगची उपमा दिली आहे आणि सोशल मीडियावर त्याला याच नावाने संबोधत आहेत. नवाजने कधीच आपल्या शरीरयष्टीवर लक्ष दिले नाही. मात्र नेहमीच त्याचे त्याच्या अभिनय क्षमता व मेहनतीवर विश्वास आहे. त्यामुळेच आज तो आपल्या भूमिका सक्षमपणे पार पाडून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवतो आहे. आगामी काळात नवाजुद्दीन वेगवेगळ्या भूमिका साकारताना दिसणार आहे. त्याचे चाहते त्याच्या चित्रपटांबद्दल जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत.