Join us

नवज्योत सिंग सिद्धूच्या लेकीने शेअर केलेत BOLD फोटो, बॉलिवूड अभिनेत्रींनाही देते टक्कर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2019 11:53 IST

एकीकडे सिद्धू त्यांच्या भाषणामुळे चर्चेत असतात. तर दुसरीकडे त्यांची लेक राबिया सोशल मीडियावरच्या हॉट फोटोंमुळे चर्चेत असते.

ठळक मुद्देसिंगापुर येथील  LASALLE कॉलेज ऑफ आर्ट्स येथून फॅशन डिझायनिंगचा अभ्यास केल्यानंतर सध्या ती लंडनमध्ये फॅशन डिझाईनिंगमध्ये मास्टर डिग्री घेत आहे.

माजी क्रिकेटपटू आणि राजकीय नेते नवज्योत सिद्धू यांना कोण ओळखत नाही. नवज्योत सिद्धू लवकरच कपिल शर्माच्या शोमध्ये परतणार असल्याची चर्चा आहे. पण तूर्तास आम्ही सिद्धू यांच्याबद्दल नाही तर त्यांची लाडकी लेक राबिया सिद्धू हिच्याबद्दल सांगणार आहोत. एकीकडे सिद्धू त्यांच्या भाषणामुळे चर्चेत असतात. तर दुसरीकडे त्यांची लेक राबिया सोशल मीडियावरच्या हॉट फोटोंमुळे चर्चेत असते. होय, तूर्तास राबियाचे असेच काही हॉट फोटो  सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.

राबिया सोशल मीडियावर कमालीची अ‍ॅक्टिव्ह आहे. स्टार किड्सप्रमाणे तिचेही मोठे फॅन फॉलोविंग आहे. ती रोज स्वत:चे बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. तिचे असेच काही बोल्ड फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

पार्टी आणि फॅशन हे दोन राबियाचे आवडते छंद आहेत. याचमुळे फॅशन डिझाईनर बनण्याचा निर्णय तिने घेतला आहे.

  सिंगापुर येथील  LASALLE कॉलेज ऑफ आर्ट्स येथून फॅशन डिझायनिंगचा अभ्यास केल्यानंतर सध्या ती लंडनमध्ये फॅशन डिझाईनिंगमध्ये मास्टर डिग्री घेत आहे.

राबिया आईला सर्वात जवळची मैत्रिण मानते. काही वर्षांपूर्वी ती वडिलांसोबत ‘द कपिल शर्मा’ शोमध्ये आली होती. यावेळी तिने कुटुंबाबद्दल अनेक खुलासे केले होते.

 पुलवामा हल्ल्यानंतर वादग्रस्त विधान केल्यामुळे सिद्धू यांच्यावर सर्व स्तरातून टीका झाली होती. यानंतर ‘द कपिल शर्मा शो’मधून त्यांना काढून टाकण्यात आले होते. पण सिद्धू शोमधून गेल्यानंतर शोचा टीआरपी घसरल्याने त्यांना पुन्हा शोमध्ये आणण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे कळतेय.

टॅग्स :नवज्योतसिंग सिद्धूकपिल शर्मा