Join us

​वरूणच्या विरहाने नताशा व्याकूळ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2016 18:21 IST

वरूण धवन सध्या आलिया भट्ट हिच्यासोबत‘बद्रिनाथ की दुल्हनिया’च्या शूटींगमध्ये बिझी आहे. राजस्थान आणि उत्तर प्रदेशात या चित्रपटाचे शूटींग सुरु ...

वरूण धवन सध्या आलिया भट्ट हिच्यासोबत‘बद्रिनाथ की दुल्हनिया’च्या शूटींगमध्ये बिझी आहे. राजस्थान आणि उत्तर प्रदेशात या चित्रपटाचे शूटींग सुरु आहे. तिकडे वरूण  आपल्या कामात बिझी आहे. पण इकडे त्याची कथित गर्लफे्रन्ड नताशा दलाल हिचे मन मात्र कशातच रमेनासे झाले आहे. वरूणच्या आठवणीने ती अक्षरश: व्याकुळ झाली आहे. आज(शनिवारी) नताशा मुंबईच्या एका हॉटेलात मैत्रिणींसोबत दिसली. ती वरूणला खूप मिस करतेय,हे नताशा तिच्या मैत्रिणींनी याठिकाणी सांगत  होती. आमच्या सूत्रांनी नताशाचे शब्द ऐकले अन् आम्ही ही बातमी तुमच्यापर्यंत पोहोचली. आता ही बातमी अशीच वरूणपर्यंत पोहोचावी, अशीच आमची इच्छा आहे.