Join us

​‘हाऊसफूल’ पाहताना कंटाळली होती नरगीस!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2016 21:05 IST

अभिनेत्री नरगिस फाखरी लवकरच ‘हाऊसफूल ३’मध्ये झळकणार आहे. पण तुम्हाला माहितीयं, ‘हाऊसफूल १’ पाहताना नरगिस जाम कंटळली होती. कधी ...

अभिनेत्री नरगिस फाखरी लवकरच ‘हाऊसफूल ३’मध्ये झळकणार आहे. पण तुम्हाला माहितीयं, ‘हाऊसफूल १’ पाहताना नरगिस जाम कंटळली होती. कधी एकदा चित्रपट संपतो आणि आपण चित्रपटगृहातून बाहेर पडतो, असे तिला झाले होते. होय, नरगिसने स्वत:च एका मुलाखतीत ती खट्याळ आठवण शेअर केली. मी भारतात आले तेव्हा पहिल्यांदा चित्रपट पाहायला गेले. तो प्रसंग मला आजही आठवतो. माझ्यासोबत माझे काही मित्रही होते. ‘हाऊसफूल’ पाहायला आम्ही गेलो होतो. इन्टर्व्हलमध्ये चित्रपट संपला म्हणून मी बाहेर पडण्यासाठी उठून उभे झाले.ते पाहून, तू कुठे निघालीस, असे मला माझ्या मित्रांनी मला विचारले.  हा इन्टर्व्हल आहे.  पिक्चर तो अभी बाकी है, हेही  त्यांनी मला सांगितले. इन्टर्व्हल...इन्टर्व्हल म्हणजे काय? मला आणखी किती वेळ इथे बसावे लागणार? असे भले मोठे प्रश्नचिन्ह त्यावेळी माझ्या चेहºयावर होते आणि आज आश्चर्य पाहा, त्याच ‘हाऊसफूल’च्या सिक्वलमध्ये मी काम करतेयं...असे सांगून नरगिस जाम हसत सुटली...आहे ना गंमत...