Join us

नर्गिस एक महिन्याच्या सक्तीच्या सुट्टीवर ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2016 18:24 IST

शीर्षक वाचून विचारात पडलात ना की नर्गिसने नक्की कशापासून सुट्टी घेतलीय ते? तिचा आगामी चित्रपट ‘हाऊसफुल्ल ३’ चे प्रमोशन ...

शीर्षक वाचून विचारात पडलात ना की नर्गिसने नक्की कशापासून सुट्टी घेतलीय ते? तिचा आगामी चित्रपट ‘हाऊसफुल्ल ३’ चे प्रमोशन करायचे बाकी असताना तिने कशामुळे सुट्टी घेतली असे तुम्हाला वाटत असेल...पण, काहीही तर्क काढण्याअगोदर हे ऐका की तिची म्हणे तब्येत ठीक नसल्याने तिने कामापासून सुट्टी घेतली आहे. ‘अजहर’ च्या शूटिंगवेळीच तिची तब्येत ठीक नव्हती. ‘ओये ओये’ गाण्यावेळी तिला खुप ताप आला होता. तेव्हापासून तिची तब्येतीच्या तक्रारीच सुरू आहेत. ‘हाऊसफुल्ल ३’ च्या प्रमोशनवेळी तिला १०१ डिग्री ताप होता.तिला डॉक्टरांनी सक्तीचा आराम करायला सांगितलेला असताना तिने साजिद सरांना विनंती केली की, तिला ‘हाऊसफुल्ल ३’ च्या प्रमोशनपासून थोडी सुटका मिळू शकेल का याविषयी ? तेव्हा तिला खरंच एका महिन्याच्या सक्तीच्या सुट्टीवर पाठवण्यात आले.आता खरंच हे कारण आहे की, तिचा बॉयफ्रें ड उदय चोप्रा याच्यासोबत तिचा झालेला ब्रेकअप हा तिच्या सुट्टी घेण्यामागीलही उद्देश असू शकतो. वेल, आता नक्की काय ते नर्गिसलाच माहिती असणार हो ना!