Join us

नर्गिस फखरीला त्याने संबोधले कॅटरिना कैफ ! मग झाले असे काही!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2017 11:02 IST

सार्वजनिक ठिकाणी सेलिब्रिटींना पाहून चाहते सुखावतात. मग त्यांच्यासोबत सेल्फी, त्यांचा आॅटोग्राफ, त्यांच्यासोबत फोटो घेण्यासाठी जीवाची धडपड करतात. नर्गिस फखरीसोबतही ...

सार्वजनिक ठिकाणी सेलिब्रिटींना पाहून चाहते सुखावतात. मग त्यांच्यासोबत सेल्फी, त्यांचा आॅटोग्राफ, त्यांच्यासोबत फोटो घेण्यासाठी जीवाची धडपड करतात. नर्गिस फखरीसोबतही अलीकडे असेच काही झाले. तिला बघतात, चाहते तिच्यादिशेने धावले. कुणाला तिच्यासोबत फोटो काढून घ्यायचा होता. कुणाला सेल्फी  तर कुणाला तिचा आॅटोग्राफ हवा होता. नर्गिसही हे सगळे एन्जॉय करत होती. पण अचानक असे काही झाले की, नर्गिसचा पारा चांगलाच चढला. गर्दीतील एका व्यक्तिने असे काही केले की, नर्गिस चांगलीच संतापली. होय, हा व्यक्ती नर्गिसला कॅटरिना समजून बसला. केवळ इतकेच नाही तर, त्याने नर्गिसला चक्क कॅटरिना संबोधले.कॅटरिना, काय मी तुझ्यासोबत फोटो घेऊ शकतो? असे त्याने नर्गिसला विचारले. त्याचा तो प्रश्न पाहून नर्गिसला आश्चर्याचा धक्का बसला. अर्थात प्रारंभी तिने ते सगळे अतिशय खिलाडू वृत्तीने घेतले. थँक्स, पण मी कॅटरिना कैफ नाही, असे तिने त्या व्यक्तीला शांतपणे सांगितले. पण कॅटच्या त्या चाहत्यावर ‘कॅटरिना’ नावाने चांगलीच जादू केली होती. तो यावर काय बोलला माहितीयं? काही हरकत नाही, तू कॅटरिना नसलीस तरी तिच्यासारखीच दिसते. त्यामुळे मी तुझ्यासोबतच फोटो घेतो, असे तो नर्गिसला म्हणाला.  

A man just said hi Katrina can I take a pic. I said thanks but I'm not her. He said oh ok I'll take a pic of u anyway cuz u look like her. </div></div><div class=