Join us

नंदिता दास म्हणतेय, नात्यात कुठलेच नियम नसतात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2017 19:50 IST

काही महिन्यांपूर्वीच आपल्या पतीपासून विभक्त झालेली अभिनेत्री तथा दिग्दर्शक नंदिता दास हिच्या मते, नात्यात कुठल्याच प्रकारचे नियम नसतात. पतीपासून ...

काही महिन्यांपूर्वीच आपल्या पतीपासून विभक्त झालेली अभिनेत्री तथा दिग्दर्शक नंदिता दास हिच्या मते, नात्यात कुठल्याच प्रकारचे नियम नसतात. पतीपासून विभक्त झाल्याच्या चर्चेवर ती बोलण्यास सपशेल नकार देते. तिच्या मते, नात्याशी संबंधित असलेल्या गोष्टी या खूपच खासगी असतात. एका न्यूज एजंसीने तिला तिच्या वैवाहिक जीवनाविषयी बोलतं करण्याचा प्रयत्न केला. तिला विचारले की, दोन लोक जे एकाच इंडस्ट्रीशी संबंधित आहेत त्यांच्यासाठी घटस्फोट घेणे किती अवघड असते? त्यावर नंदिताने सांगितले की, नात्याला काही नियम नसतात. सुबोध आणि मी एकाच प्रोफेशनशी नव्हतो. आम्ही फक्त एका प्रोजेक्टमध्ये एकत्र काम केले आहे. नंदिता दास आणि सुबोध मस्करानंदिता दास हिने काही दिवसांपूर्वीच पती सुबोध मस्करासोबत घटस्फोट घेतला आहे. सुबोध आणि नंदिता यांनी ‘बिटवीन द लाइन्स’ नावाच्या नाटकात २०१२ मध्ये एकत्र काम केले होते. नंदिताने सांगितले की, सुबोध कशा पद्धतीने या प्लेपासून आपल्या करिअरला सुरुवात केली. जेव्हा मी हे नाटक लिहित होती तेव्हा सुबोधला या नाटकात घेण्याविषयीचा विचारही केला नव्हता. मात्र त्याला अभिनय क्षेत्रात करिअर करायचे होते. मी त्याला होकार दिला. कारण हे नाटक एका जोडप्यावर आधारित होते. ‘बिटवीन द लाइन्स’ वकील दाम्पत्याची कथा आहे. जे एकच खटला वेगवेगळ्या पक्षाकडून लढत असतात. त्यामुळे त्यांच्या आयुष्यात अनेक चढउतार येत असतात. प्रोफेशन लाइफविषयी बोलताना नंदिताने सांगितले की, हे सुरुवातीपासून सहज-सोपे व अवघड होते. कारण बºयाचदा प्लेविषयीच्या चर्चा घरी रंगत होत्या, तर घरच्या चर्चा सेटवर रंगत होत्या. आमच्या दोघांसाठीही हा प्रवास खूपच आव्हानात्मक होता. कारण मुलांना सोडून आम्हाला प्लेसाठी बाहेर रहावे लागत असे. ‘बिटवीन द लाइन्स’ हा पहिला सिनेप्ले होता जो पहिल्यांदाच हॉटस्टारवर लाइव्ह दाखविण्यात आला. सुबोधसोबत नंदिताचे हे दुसरे लग्न होते. तिने पहिले लग्न २००२ मध्या सौम्स सेन याच्याबरोबर केले होते. पुढे सात वर्षांनंतरच (२००९) त्यांच्यात घटस्फोट झाला. पुढे २०१० मध्ये नंदिताने सुबोधबरोबर विवाह केला. मात्र त्यांच्यासोबतचेही वैवाहिक जीवन संपुष्टात आले आहे.