नाना पाटेकर यांना मल्हारशिवाय देखील होता आणखी एक मुलगा... जाणून घ्या नानाच्या वैयक्तिक आयुष्याविषयी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2018 13:04 IST
नाना पाटेकर यांनी मराठी आणि बॉलिवूडमध्ये त्यांचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्याच्या अभिनयावर आज त्यांचे फॅन्स फिदा ...
नाना पाटेकर यांना मल्हारशिवाय देखील होता आणखी एक मुलगा... जाणून घ्या नानाच्या वैयक्तिक आयुष्याविषयी
नाना पाटेकर यांनी मराठी आणि बॉलिवूडमध्ये त्यांचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्याच्या अभिनयावर आज त्यांचे फॅन्स फिदा आहेत. बॉलिवूडमधील सगळ्यात चांगल्या अभिनेत्यांमध्ये त्यांची गणना केली जाते. आज त्यांनी क्रांतीवीर, वेलकम, परिंदा, अग्निसाक्षी, राजू बन बया जंटलमॅन, तिरंगा, अपहरण यांसारख्या अनेक हिंदी तर नटसम्राट, सिंहासन, माफीचा साक्षीदार, पक पक पकाक, देऊळ, डॉ. प्रकाश बाबा आमटेः द रिअल हिरो यांसारख्या मराठी चित्रपटात खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. नाना यांचा १ जानेवारी म्हणजेच आज वाढदिवस असून ते ६७ वर्षांचे झाले आहेत. आजही या वयात ते तितक्याच जोशाने काम करत आहेत. त्यांचा आपला मानूस हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नाना यांचा जन्म मुरूड जंजिरातील एका सामान्य कुटुंबातील आहे. नानांच्या व्यवसायिक आयुष्यासोबत नेहमीच नानांचे वैयक्तिक आयुष्य चर्चेत राहिले आहे. नाना यांचे नाव आजवर अनेक अभिनेत्रींशी जोडले गेले आहे. नाना यांचे लग्न नीलकांती पाटेकर यांच्यासोबत झाले होते. नाना आणि नीलकांती यांनी प्रेमविवाह केला होता. त्यावेळी नाना २७ वर्षांचे होते. लग्न झाले त्यावेळी नीलकांती नानांपेक्षा अधिक कमवत होत्या. त्यावेळी त्या बँकेत नोकरीला असून त्यांचा पगार अडीज हजार रुपये होता तर नाना केवळ साडे सातशे रुपये कमवत असत. पण नाना यांना अभिनयाची असलेली आवड नीलकांती यांनी ओळखली होती. नानांच्या करियरमध्ये त्या नेहमीच त्यांच्या पाठिशी उभ्या राहिल्या. त्यांच्या पाठिंब्यामुळेच नाना पाटेकर यांना अभिनय क्षेत्रात यश मिळवता आले. नीलकांती देखील एक अभिनेत्री असून त्यांनी आत्मविश्वास या चित्रपटात काम केले आहे. आत्मविश्वास या चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला आहे. त्या सध्या गोठ या मालिकेत बयो आजी ही व्यक्तिरेखा साकारत आहेत.नीलकांती आणि नाना यांना मल्हार हा मुलगा असून त्याला अनेकवेळा नानांसोबत पाहायला मिळते. पण तुम्हाला माहीत आहे का, मल्हारच्या आधी देखील नानांना आणि नीलकांती यांना एक मुलगा होता. पण जन्मानंतर लगेचच त्याचा मृत्यू झाला. नाना आणि नीलकांती गेल्या अनेक वर्षांपासून वेगळे राहात आहेत. Also Read : अजय देवगणच्या आपला मानूसचे पहिले पोस्टर पाहिले का?