Nana Patekar : नाना पाटेकर हे भारतीय मनोरंजन विश्वातील गाजलेलं नाव. त्यांनी आजवर अनेक चित्रपटांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. एकाच चौकटीत न राहता नानांनी वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारत त्यांच्या अभिनयाच्या कक्षा वाढवल्या. नाना पाटेकर यांनी गंभीर भूमिकांबरोबरच विनोदी भूमिका साकारून प्रेक्षकांना त्यांच्या प्रेमात पाडले. नाना पाटेकर त्यांच्या फिल्मी करिअरप्रमाणेच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही नेहमी चर्चेत असतात. सिनेसृष्टीत यशस्वी करिअर असतानाही नाना पाटेकर अतिशय साधे जीनव जगतात. त्यांच्या साधेपणाचे सर्वच कौतुक करतात. अभिनयाप्रमाणेच नाना यांना स्वयंपाकाचीही आवड आहे. नुकतेच एका अभिनेत्रीला नाना पाटेकरांनी स्वत:च्या हातांनी जेवण बनवून दिले. याचा व्हिडीओ अभिनेत्रीने शेअर केला आहे.
अभिनेत्री मेघना मलिकने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून नाना पाटेकरांचा जेवण बनवतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये तिनं लिहलं, "हे आहेत नाना पाटेकरजी… एक उत्तम अभिनेते असण्याबरोबरच ते एक उत्तम स्वयंपाकीसुद्धा आहेत. एके दिवशी काही कारणास्तव शूटिंगवर रात्रीच्या जेवणाची सोय होऊ शकली नाही. पॅकअप झाल्यावर मी हॉटेलवर पोहोचले, तर तिथे नाना पाटेकर जेवत होते. मला भुकेनं व्याकुळ झालेलं बघून ते लगेच हॉटेलच्या किचनमध्ये गेले. स्वतःच्या घरचे काही खास मसाले घेतले, जे त्यांच्याबरोबर नेहमीच असतात आणि त्यांनी माझ्यासाठी स्वतःच्या हातांनी खिमा बनवला. नाना पाटेकर तुम्ही कमाल आहात". हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
नाना पाटेकर यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर नुकतंच त्यांची 'संकल्प' ही वेबसीरिज प्रदर्शित झाली आहे. प्रकाश झा यांनी 'संकल्प' या वेबसीरिजचं दिग्दर्शन केलं आहे. सीरिजमध्ये नाना पाटेकरांसह मोहम्मद झिशान अयुब, कुब्रा सैत आणि संजय कपूर हे कलाकार पाहायला मिळत आहेत. MX प्लेअरवर ही वेबसीरिज रिलीज झाली आहे. या सीरिजमध्ये नाना पाटेकर आणि मेघना मलिकने एकत्र काम केले आहे.
Web Summary : Nana Patekar cooked a meal for actress Meghna Malik at a hotel after a late shoot. Malik shared a video of the actor cooking, praising his culinary skills and kind gesture. Patekar's web series 'Sankalp' was recently released.
Web Summary : देर रात शूटिंग के बाद नाना पाटेकर ने अभिनेत्री मेघना मलिक के लिए होटल में खाना बनाया। मलिक ने अभिनेता के खाना बनाते हुए एक वीडियो साझा किया, जिसमें उनके पाक कौशल और दयालु स्वभाव की प्रशंसा की गई। पाटेकर की वेब सीरीज 'संकल्प' हाल ही में रिलीज हुई।