नाना आणि माधुरी पुन्हा येणार का एकत्र..
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2016 06:05 IST
बॉलिवूडमधील प्रसिद्ध कलाकार नाना पाटेकर आणि चाहत्यांना आपल्या अदांनी व सौर्दयाने मोहिनी घालणारी ...
नाना आणि माधुरी पुन्हा येणार का एकत्र..
बॉलिवूडमधील प्रसिद्ध कलाकार नाना पाटेकर आणि चाहत्यांना आपल्या अदांनी व सौर्दयाने मोहिनी घालणारी धकधक गर्ल म्हणजे माधुरी दिक्षीत या दोघांना पुन्हा पाहायला तुम्हाला आवडेल का.. २०१३ मध्ये प्रदर्शित झालेला मदर द इंदिरा गांधी स्टोरी या चित्रपटानंतर ही जोडी प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर एकत्रीत दिसली नाही. या चित्रपटानंतर ही धमाकेदार जोडी पुन्हा केव्हा दिसेल असा प्रश्न या दोघांच्या चाहत्यांना पडला होता. या दोन्ही दिग्गज कलावंताच्या चाहत्यांचा त्या दोघांना एकत्रीत पाहण्याची प्रतिक्षा संपली असे बोलायला काहीच हरकत नाही. सूत्रांकडून आलेल़्या माहितीनुसार आता ही जोडी पुन्हा एकदा एका चित्रपटामध्ये एकत्रीत काम करणार आहे. तसेच नानांनी आपल्या बीझी शेड्यूल मधून या चित्रपटामध्ये काम करण्यास होकार दिला असल्याचेही समजले आहे. या चित्रपटाचे नाव जरी गुलदस्त्यात असले तरी हा चित्रपट नाना पाटेकर व माधुरी दिक्षीत यांच्या चाहत्यासाठी पर्वणी ठरणार आहे हे नक्कीच.