माझ्या आगामी चित्रपटाचे नाव ‘ईव’ नाही -अमिताभ
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2016 07:52 IST
माझ्या नव्या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु झाले आहे. दिल्लीत शूटींग सुरु आहे. पण माझ्या या चित्रपटाचे नाव ‘ईव’ नाही, असा ...
माझ्या आगामी चित्रपटाचे नाव ‘ईव’ नाही -अमिताभ
माझ्या नव्या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु झाले आहे. दिल्लीत शूटींग सुरु आहे. पण माझ्या या चित्रपटाचे नाव ‘ईव’ नाही, असा खुलासा अमिताभ यांनी केला आहे. चित्रपटाचे नाव अद्याप ठरायचे आहे. येत्या काही दिवसात नाव ठरेल...असे अमिताभने फेसबुकवर स्पष्ट केले आहे. शूजीत सरकार निर्मित आणि बंगाली दिग्दर्शक अनिरूद्ध राय चौधरी दिग्दर्शित या चित्रपटाबाबत रोज नवनव्या बातम्या येत आहे. राय यांचा हा पहिला हिंदी चित्रपट असेल.