Join us

​ नागार्जुन यांनी सून समंथाशी केले चॅट...झाले व्हायरल!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2017 15:28 IST

दाक्षिणात्य सुपरस्टार नागार्जुन आणि त्याची होणारी सून यांच्यातील प्रेमळ नाते, जगापुढे आले आहे. होय, सासरा अन् सूनेचे चॅट सोशल ...

दाक्षिणात्य सुपरस्टार नागार्जुन आणि त्याची होणारी सून यांच्यातील प्रेमळ नाते, जगापुढे आले आहे. होय, सासरा अन् सूनेचे चॅट सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.  होय, नागार्जुनचा मुलगा नागा चैतन्य याचा ‘रारंदोइ वेदुका चुडम’ ( Rarandoi Veduka Chudam) हा चित्रपट येतो आहे. या चित्रपटाचा ट्रेलर अलिकडेच आऊट झाला. विशेष म्हणजे या ट्रेलरला लोकांना उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. मुलाचा हा ट्रेलर पाहून नागार्जुन कमालीचे सुखावले आणि त्यांनी हा आनंद नागा चैतन्यची होणारी पत्नी समंथा हिच्यासोबत शेअर केला. मग काय, दोघांचेही चॅट सुरु झाले. समंथासोबतच्या या चॅटचा एक फोटो नागार्जुन यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केला आहे.