Join us
Daily Top 2Weekly Top 5

ज्या प्रसिद्ध अभिनेत्यासोबत तब्बूचं 10 वर्षे होतं अफेअर: त्याच्या लेकाचं अभिनेत्रीशी खास बॉन्डिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2023 14:22 IST

हिरो-हिरोईनचे लग्न झाले असले तरी त्यांची ऑन-स्क्रीन केमिस्ट्री आवडली की मग ते आपले वैयक्तिक आयुष्य पणाला लावून जवळ येतात, असे अनेकदा पाहायला मिळतं.

फिल्म इंडस्ट्रीमध्ये डेटिंग रूमर्स आणि लिंक-अप खूप सामान्य आहेत. हिरो-हिरोईनचे लग्न झाले असले तरी त्यांची ऑन-स्क्रीन केमिस्ट्री आवडली की मग ते आपले वैयक्तिक आयुष्य पणाला लावून जवळ येतात, असे अनेकदा पाहायला मिळतं. अनेकवेळा असं देखील घडलं आहे की सहकलाकार वास्तविक जीवनात देखील लग्न करतात, जरी ते आधीच जोडीदाराशी जोडलेले असले तरीही. एक काळ असा होता जेव्हा नागार्जुन अक्किनेनी आणि तब्बू हे सर्वात लोकप्रिय कपल पैकी एक होतं. 

तब्बूचे साऊथ स्टार नागार्जुनवर दहा वर्षांपासून प्रेम होतं, असं म्हटलं जातं. हे अशा वेळी होतं जेव्हा अभिनेता आधीच विवाहित होता आणि त्याला नागा चैतन्य नावाचा मुलगा होता.मात्र, नागार्जुन आणि तब्बू यांनी त्यांच्या नात्याबद्दल कधीही अधिकृतपणे काहीच सांगितलं नाही. असं म्हटलं जातं की, दोघांमध्ये जवळपास 10 वर्षे अफेअर होतं. अनेकवेळा दोघेही सार्वजनिकरित्या एकत्र दिसले.

एका मुलाखतीत नागा चैतन्यला बॉलिवूड सेलिब्रिटींसोबतच्या त्याच्या बाँडिंगबद्दल विचारण्यात आले आणि त्याने तब्बूचं नाव घेतलं. या प्रश्नाच्या उत्तरात नागा चैतन्य म्हणाला, बॉन्ड फार नाहीत, पण आमीर सरांसोबत खूप चांगलं बाँडिंग आहे आणि तब्बूसोबतही बाँडिंग आहे. तब्बूने 2000 साली नागा चैतन्यच्या पिका या चित्रपटामुळे खूप चर्चेत राहिली होती. तथापि, नागार्जुन आणि अमला या दोघांनी डेटिंगच्या अफवांचे खंडन केलं. 

तब्बू जेव्हा कॉफी विथ करण या शोमध्ये सहभागी झाली होती, तेव्हा होस्ट करण जोहरने तिला याबद्दल विचारले तेव्हा ती म्हणाली, 'नागार्जुनची ही गोष्ट खूप जुनी आहे. ही चर्चा सतत होत राहते. मला नेहमीच आश्चर्य वाटतं की मला बॉयफ्रेंड आहे की नाही, बॉयफ्रेंड येतो, बॉयफ्रेंड जातो हे मीडिया सतत सांगत असते. 

तब्बू पुढे म्हणाली, 'मला याबद्दल काय बोलावं ते समजत नाही, त्याशिवाय तो माझ्या आयुष्यातील सर्वात जवळच्या व्यक्तींपैकी एक आहे. तो माझ्या सर्वात महत्त्वाच्या नात्यांपैकी एक आहे आणि माझे त्याच्याशी असलेलं नातं माझ्यासाठी इतके खास आहे की त्याच्यासोबतच्या माझ्या नात्याची जागा कधीही बदलू शकत नाही. माझ्याकडे यासाठी कोणतंही लेबल नाही. यासाठी मी काहीही करू शकत नाही. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :तब्बूबॉलिवूड