Join us

नागा चैतन्यने समांथासोबतच्या नात्याबद्दल केला मोठा खुलासा, म्हणाला - 'तिच्याशी...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2022 20:44 IST

दाक्षिणात्य प्रसिद्ध अभिनेत्री समांथा रूथ प्रभू आणि अभिनेता नागा चैतन्य यांच्या घटस्फोटाची बातमी ऐकून त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला होता.

दाक्षिणात्य प्रसिद्ध अभिनेत्री समांथा रूथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) आणि अभिनेता नागा चैतन्य (Naga Chaitanya) यांच्या घटस्फोटाची बातमी ऐकून त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला होता. आता या घटनेला बरेच दिवस उलटून गेले असले तरी या दोघांची सोशल मीडियावर वारंवार चर्चा ऐकायला मिळत असते. त्यांच्या घटस्फोटानंतर त्यांच्या नात्याबद्दलही बरेच काही बोलले गेले पण तरी या दोघांनी एकमेकां विरोधात काहीच वक्तव्य केले नाही. आज नागा चैतन्य ३६ वा वाढदिवस साजरा करत आहे.

नागा चैतन्यने एका मुलाखतीत त्याच्या आणि समांथाच्या नात्याबद्दल खुलासा केला आहे. समांथाला प्रपोझ करण्यासाठी नागा चैतन्यला किती मेहनत घ्यावी लागली याविषयी त्याने खुलासा केला. तो म्हणाला, तब्बल १० वर्षांपूर्वी मी आणि समांथा एका चित्रपटाच्या सेटवर भेटलो. त्यातली ७ वर्षे ही तिला इम्प्रेस करण्यातच गेली. माझ्याकडे तिच्याशी लग्न करण्याशिवाय काहीच पर्याय नव्हता. याविषयी जेव्हा समांथाला विचारण्यात आले होते, तेव्हा मात्र तिने मस्करीत उत्तर दिले होते की, नागा चैतन्य हा बऱ्याच मुलींच्या मागे होता, माझा नंबर लागायला त्याने ७ वर्षं घेतली होती. 

या दोघांच्या लग्नानंतरचे बरेच किस्से आजही लोकांना ठाऊक आहेत. हे दोघे वेगळे झाल्याचं त्यांच्या चाहत्यांना पसंत पडलेले नाही. समांथाने नुकतेच ‘कॉफी विथ करण’च्या मंचावर तिच्या आणि नागा चैतन्यच्या नात्याबद्दल खुलासा केला. शिवाय या दोघांनी अत्यंत भावूक पोस्ट शेअर करत एकमेकांपासून वेगळे झाल्याचे वृत्त चाहत्यांना सांगितले होते. नुकताच समांथाचा ‘यशोदा’ हा चित्रपट प्रदर्शित झाला ज्याला प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. शिवाय नागा चैतन्यने आमिरच्या ‘लाल सिंग चड्ढा’मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

टॅग्स :समांथा अक्कीनेनी