Join us
Daily Top 2Weekly Top 5

कॅन्सरशी सामना केल्यानंतर आता बॉलिवूडची ही 62 वर्षीय अभिनेत्री मागतेय सिनेमात काम, तिला ओळखणंही झालंय कठीण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2019 20:00 IST

62 वर्षीय अभिनेत्रीनं सोशल मीडियावरील पोस्टच्या माध्यमातून पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री नफीसा अली यांनी कॅन्सरशी सामना केल्यानंतर आता पुन्हा एकदा चित्रपटात त्यांना काम करायचं आहे. 62 वर्षीय नफीसा अली यांनी नुकतंच सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत इमोशनल पोस्ट लिहिली. या पोस्टच्या माध्यमातून त्यांनी पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

नफीसा यांनी सांगितलं की, त्या चांगल्या स्क्रीप्ट्सच्या शोधात आहेत आणि त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी त्यांना काम करायचं आहे. त्यांनी म्हटलं की, मी नफीसा अली सोढी. भारतीय चित्रपटात एक चांगली भूमिका साकारायची आहे. एक ज्येष्ठ अभिनेत्री असल्यामुळे मी चांगल्या स्क्रीप्टच्या शोधात आहे. माझ्या भावना व्यक्त करण्यासाठी मी काम शोधते आहे. 

नफीसा यांनी पुढे लिहिलं की, मी प्रार्थना करते की देव आपल्या सगळ्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ताकद देवो. भारतात युवा, महिलांना लक्ष्य करणं सोडून द्या. धर्माच्या नावावर लोकांना त्रास देऊ नका. भारत सर्वात वेगळा देश आहे आणि भारतातील एकता टिकवण्यासाठी आपल्याला प्रयत्न केले पाहिजे. डिवाइड अँड रुल बंद केले पाहिजे. एक चांगल्या जगासाठी फोकस करा.

नफीसा यांच्या पूर्वी अभिनेत्री नीना गुप्ता हिने देखील सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट लिहून सिनेइंडस्ट्रीत काम मागितलं होतं. नीना गुप्ता यांच्या पावलावर पाऊल टाकत आता नफीसा अली यांनीदेखील काम मागण्यासाठी सोशल मीडियाची मदत घेतली.

नफीसा यांना काही दिवसांपूर्वी तिसऱ्या स्टेजचा कर्करोग असल्याचं निदान झालं होतं. त्या इंस्टाग्रामवर पोस्टच्या माध्यमातून आपल्या आजाराची माहिती देत होत्या. कर्करोगाच्या उपचारादरम्यान नफीसा यांनी आपल्या चाहत्यांना त्यांच्या तब्येतीची माहिती दिली होती.

नफीसा अली यांच्या सिनेइंडस्ट्रीतील कामाबद्दल सांगायचं तर त्यांनी मेजर साहब, यह जिंदगी का सफर, बेवफा, लाइफ इन अ मेट्रो आणि गुजारिश या चित्रपटात काम केलं आहे.

त्या शेवटच्या साहेब बीवी और गँगस्टर 3 चित्रपटात झळकल्या होत्या.

टॅग्स :नफीसा अलीनीना गुप्ता