Join us
Daily Top 2Weekly Top 5

'नदियाँ के पार'च्या 'गुंजा'ची लेक तिच्यापेक्षाही सुंदर, पतीला २ महिन्यातच दिला होता घटस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2019 16:09 IST

साधना सिंह आजही जिथे जातात तिथे त्यांना गुंजा नावाने ओळखलं जातं. शहरातच नाही तर गावागावतही साधना सिंह यांचे अनेक चाहते आहेत.

अभिनेत्री साधना सिंह यांनी  'नदियाँ के पार 'या हिंदी सिनेमात गुंजा ही भूमिका साकारली होती.  हिंदी चित्रपटसृष्टीतील हा सुपरहिट सिनेमा. साधना सिंह यांनी साकारलेली निरागस गुंजा आजही रसिकांच्या मनात घर करून आहे. साधना सिंह आजही जिथे जातात तिथे त्यांना गुंजा नावाने ओळखलं जातं. शहरातच नाही तर गावागावतही साधना सिंह यांचे अनेक चाहते आहेत. त्या जिथं जातात त्यांची एक झलक पाहण्यासाठी त्यांच्याभोवती चाहत्यांचा गराडा जमा होतो. त्यांची लोकप्रियता अशी की अनेकांनी आपल्या मुलींची नावं गुंजा ठेवली. आता गुंजा म्हणजेच साधना यांची मुलगीही चर्चेत आली आहे. शीना शाहाबादी असे मुलीचे नाव आहे. सोशल मीडियावर तिच्या ग्लॅमरस फोटोंनी सा-यांचे लक्ष वेधले आहे. शीना ही आई साधना प्रमाणेच सुंदर आहे.

शीना शाहाबादीनेही सिनेमात काम केले आहे. मात्र तिला देखीला आईप्रमाणे यश मिळाले नाही. बॉलिवूडमध्ये कामाची संधी मिळाली नाही म्हणून शीना दाक्षिणात्य सिनेमांकडे वळली.   'तेरे संग' या बॉलिवूड सिनेमातून तिने आपल्या करिअरला सुरूवात केली होती. या सिनेमात तिने अल्पवयीन गर्भवतीची भूमिका साकारली होती. तसेच जॉन अब्राहम स्टारर 'आय, मी और मैं' सिनेमातही ती झळकली होती.

आतापर्यंत तिने कन्नड़ तेलुगु भाषांमधील 12  सिनेमात काम केले आहे.  विशेष म्हणजे  शीना शाहबादीने सिनेमात एंट्री करण्यापूर्वीच 2008  मध्ये लग्नबंधनात अडकली होती.  मात्र तिचे हे लग्न फार काळ काही टिकले नाही. अवघ्या दोनच महिन्यात तिने घटस्फोट घेत वेगळी झाली होती.