Join us
Daily Top 2Weekly Top 5

जावई माझा भला !!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2017 17:34 IST

बॉलिवूडमधील अभिनेता आणि अभिनेत्री यांच्या कुटुंबायांशी आपले नाते जोडवा असे कोणाला वाटणार नाही ? बॉलिवूडमधला प्रसिद्ध परिवार असलेल्या कपूर ...

बॉलिवूडमधील अभिनेता आणि अभिनेत्री यांच्या कुटुंबायांशी आपले नाते जोडवा असे कोणाला वाटणार नाही ? बॉलिवूडमधला प्रसिद्ध परिवार असलेल्या कपूर खानदानांपासून ते खानखानदांनापर्यंत जावई बनण्याचा मान कोणाला मिळाला यावर टाकूया एक नजर. ऋषी कपूर आणि नीतू सिंग यांची कन्या रिद्धिमा ही  बॉलिवूडच्या झगमगटापासून दूर राहिली. त्यामुळे या दाम्पत्याला रणबीरसोबत मुलगी आहे हे फारसे कुणाला ठाऊक नाही. भाऊ रणबीरप्रमाणे तिने बॉलिवूडमध्ये करिअर केले नाही. कपूर खानदानाचा जावई बनण्याचा मान उद्योगपती भरत साहनीला मिळाला. 2006मध्ये भरत आणि रिद्धिमा लग्नाच्या बेडीत अडकले. भरत दिल्लीतील प्रसिद्ध उद्योगपती आहे. प्रसिद्ध लेखक सलीम खान यांची मुलगी आणि बॉलिवूडचा दबंग खान अर्थात सलमान खान याची लाडकी बहिण अर्पिता हिचा विवाह आयुष शर्माशी झाला. खान परिवाराशी नात जोडले गेल्याने आयुषला लॉटरी लागली असे म्हणले तर वावगे ठरणार नाही.आयुष आणि अर्पिता यांचा प्रेमविवाह आहे. 2014मध्ये हैदराबाद येथील फालाक्नुमाल पॅलेसमध्ये त्यांचा शाही विवाह पार पडला होता. अर्पिता आणि आयुष यांना एका गोंडस मुलगा देखील आहे. कुणाल खेमूचा विवाह प्रसिद्ध अभिनेत्री शर्मिला टागोर आणि मंसूर अली खान पतौडी यांची कन्या सोहा अली खानसोबत झाला आहे. त्यामुळे नात्याने  सैफ अली खान हा  कुणालचा मेहुणा आहे. पतौडी खानदानचा जवाई यातच सगळे आले.एका चित्रपटाच्या सेटवर दोघांची ओळख झाली. त्यानंतर मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. सोहा आणि कुणाल हा लग्नाआधी अनेक वर्ष एकमेकांना डेट करत होते. बीग बी अमिताभ बच्चन यांची लाडकी कन्या श्वेता तशी ग्लॅमरस दुनियेपासून दूर राहिली. घरात अभिनयाचा वारसा असतानाही श्वेताने या क्षेत्रात करिअर केले नाही. प्रसिद्ध उद्योगपती निखिल नंदा याच्यासोबत ती विवाह बंधनात अडकली. श्वेता आणि निखिल यांना दोन मुलं आहेत. निखिल हा ज्येष्ठ अभिनेते राज कपूर यांच्या नातू आहे.