Join us
Daily Top 2Weekly Top 5

शाहरूख म्हणतो, माझ्या मुलांचे डोळे अगदी माझ्यासारखे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2016 06:27 IST

किंगखान शाहरूखची मुले त्याच्याच पावलावर पाऊल टाकत बॉलिवूडमध्ये आली तर नवल वाटायला नको. आता तर खुद्द शाहरूखनेच त्याच्यात आणि ...

किंगखान शाहरूखची मुले त्याच्याच पावलावर पाऊल टाकत बॉलिवूडमध्ये आली तर नवल वाटायला नको. आता तर खुद्द शाहरूखनेच त्याच्यात आणि त्याच्या मुलांमध्ये किती साम्य आहे, हे पटवून देण्यासाठी आटापिटा चालवला आहे. शनिवारी मध्यरात्री शाहरूखने twitterवर एक फोटो अपलोड केला. हा फोटो म्हणजे, त्याचा आणि त्याच्या मुलांच्या उजव्या डोळ्याचा कोलाज आहे. आता हे काय नवे, असे म्हणू नका. अहो, त्याच्या डोळ्यांमध्ये आणि त्याच्या मुलांच्या डोळ्यांमध्ये किती साम्य आहे, हे दाखवण्यासाठी शाहरूखने हा कोलाजचा फोटो टाकला. या कोलाजखाली त्याने लिहिलेले कॅप्शनही मोठे झक्कास आहे.वाचायचेयं तर  वाचा, शाहरूखने लिहिलेय...  My babies have eyes like mine. Makes me feel the past, present & future are the same.