Join us

Must See : शाहिद कपूरने शेअर केला मुलगी ‘मीशा’चा फर्स्ट फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2017 16:23 IST

शाहिद कपूर त्याची लाडकी लेक मीशाचा फोटो  केव्हा चाहत्यांसोबत शेअर करतो अशी उत्सुकता सर्वांना लागलेली असतानाच त्याने इन्स्टाग्राम अकाऊंटवर ...

शाहिद कपूर त्याची लाडकी लेक मीशाचा फोटो  केव्हा चाहत्यांसोबत शेअर करतो अशी उत्सुकता सर्वांना लागलेली असतानाच त्याने इन्स्टाग्राम अकाऊंटवर मीशाचा पत्नी मीरासोबतचा फोटो शेअर केला आहे. ‘हॅलो वर्ल्ड’ असे कॅप्शन देऊन जणूकाही ती सर्व जगाला पहिल्यांदा जगासमोर आली असल्याचे दाखवून देत आहे. शाहिदचे चाहते त्याची मुलगी मीशाची एक झलक पाहण्यासाठी अक्षरश: आतुर झाले होते. मागील वर्षी २६ आॅगस्टला मीशाचा जन्म झाला तेव्हापासून ते आजपर्यंत शाहिदने कधीही त्याच्या लाडक्या लेकीचा चेहरा माध्यमांना दिसू दिला नाही. एअरपोर्टहून जातांनाही तो स्वत:च्या हृदयाजवळ तिला कवटाळून ठेवत असायचा जेणेकरून तिचा चेहरा कुणालाही दिसू नये. एका आदर्श वडिलांप्रमाणे तो तिला स्वत:पासून कधीही वेगळं होऊ देत नाही. ALSO READ : SEE PHOTO: शाहिद कपूरने लेक मीशाचा फोटो पोस्ट केला, मात्र चेहरा लपवलाअलीकडेच एका मुलाखतीत त्याला विचारण्यात आले होते तेव्हा तो म्हणाला,‘मी लवकरच मीशाची झलक सर्वांसमोर आणणार आहे. कदाचित एक महिना किंवा माझ्या बर्थडेला. मी एका विशेष वेळेची वाट पाहतो आहे. पण, लवकरच मी चाहत्यांसोबत मीशाचा फोटो शेअर करेन.’ शाहिदने कुठल्याही शुभमुहूर्ताची वाट न पाहता तिचा फोटो शेअर केला आहे. मीशाचा फोटो पाहणे हे खरंच चाहत्यांसाठी पर्वणी ठरणार आहे.