Join us
Daily Top 2Weekly Top 5

​भारतात मुस्लिमांना चांगली वागणूक मिळते- इमरान हाशमी !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2016 14:54 IST

भारतात विभिन्न धर्माचे लोक राहूनही सर्वकाही ठिक चालूा असून भारतात मुस्लिमांना चांगली वागणूक दिली जात असल्याचे मत बॉलिवूड अभिनेता ...

भारतात विभिन्न धर्माचे लोक राहूनही सर्वकाही ठिक चालूा असून भारतात मुस्लिमांना चांगली वागणूक दिली जात असल्याचे मत बॉलिवूड अभिनेता इमरान हाशमी याने व्यक्त केले. इम्रान एकदा एका उच्चभ्रू ठिकाणी, पाली हिल येथे हाऊसिंग सोसाइटीचा एक बंगला विकत घेण्यासाठी गेला होता. परंतु तो मुस्लिम असल्याने त्याला एनओसी देण्यासाठी नकार दिला होता. त्याने त्यावेळी हा मुद्दा लावूनही धरला होता.यावर इम्रानला विचारले असता तो म्हणाला, मी फ्लॅटच्या मुद्द्यावर काहीही बोलू इच्छित नाही. हे बोलणे उचित आहे किंवा नाही हे मी सांगू शकत नाही. परंतु माझी खात्री आहे की, भारतात सर्वधर्मीय एका मयार्देत, सद्भावाने राहात आहेत. मी एवढंच सांगेन, भरतात मुस्लिमांना चांगली वागणूक मिळते.इम्रान सध्या विशेष फिल्म्स निर्मित १६ सप्टेंबरला प्रदर्शित होणाऱ्या 'राज रीबूट' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री कीर्ती खरबंदा आणि गौरव अरोरा दिसणार आहे.