२०२५ च्या अखेरीस प्रदर्शित झालेला धुरंधर चित्रपट सुपरहिट झाला होता. तसेच या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली होती. एवढंच नाही तर या चित्रपटामधील कलाकारांचा अभिनय आणि गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. दरम्यान, अभिनेत्री स्वरा भास्कर हिची आई आणि प्रसिद्ध चित्रपट परीक्षक इरा भास्कर यांनी धुरंधर चित्रपटावर आणि त्यामधून देण्यात आलेल्या राजकीय संदेशावर टीका केली आहे. धुरंधर चित्रपटामध्ये मुस्लिमांना आणि पाकिस्तानला नकारात्मक आणि हिंसक दाखवले, असे इरा भास्कर म्हणाल्या.
इरा भास्कर यांनी कार्यकर्ते आणि लेखक हर्ष मंदर यांच्या युट्युब चॅनेलवरील एका कार्यक्रमामध्ये धुरंधर चित्रपटाबाबत आपलं परखड मत मांडलं होतं. धुरंधर चित्रपटाचा पुढील भाग असलेला धुरंधर द रिव्हेंज हा चित्रपट प्रदर्शित होण्याच्या ऐन आधी इरा भास्कर यांनी या चित्रपटाबाबत व्यक्त केलेलं मत समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तसेच युझर्सकडून त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
यावेळी इरा भास्कर म्हणाल्या की, आदित्य धर हे उत्तम चित्रपट दिग्दर्शक आहेत. तसेच धुरंधर चित्रपट हा तांत्रिकदृष्ट्या उत्तम बनला आहे. मात्र एखादा चित्रपट प्रोत्साहन देत असलेल्या संबंधित विचारांपासून चित्रपट कलेला वेगळं करता येईल का? असा सवाल इरा भास्कर यांनी उपस्थित केला.
हा चित्रपट नरेटिव्हचं असं एक जग उभं करतो जिथे मुस्लिमांना बहुतांश हिंसात्मक दृष्टीकोनामधून दाखवलं जात आहे. मुस्लिम हिंसक लोक आहेत आणि पाकिस्तान हा हिंसक देश आहे, असे संकेत या चित्रपटाच्या कथानकामधून मिळतात, अशा शब्दात इरा भास्कर यांनी नाराजी व्यक्त केली.
Web Summary : Ira Bhasker criticized the film 'Dhurandhar' for its portrayal of Muslims as violent and Pakistan as a violent country. She questioned whether the film's art could be separated from its message, highlighting its technically sound direction but problematic narrative.
Web Summary : इरा भास्कर ने फिल्म 'धुरंधर' में मुसलमानों को हिंसक और पाकिस्तान को हिंसक देश के रूप में चित्रित करने के लिए आलोचना की। उन्होंने सवाल उठाया कि क्या फिल्म की कला को उसके संदेश से अलग किया जा सकता है, उन्होंने इसके तकनीकी रूप से निर्देशन की सराहना की, लेकिन इसकी समस्याग्रस्त कहानी पर प्रकाश डाला।