Join us
Daily Top 2Weekly Top 5

'मर्डर २' फेम अभिनेत्रीने दिली गुडन्यूज, लग्नानंतर ४ वर्षांनी होणार आई

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2025 16:54 IST

इमरान हाशमीच्या 'मर्डर २' सिनेमात झळकलेल्या अभिनेत्रीने गुडन्यूज दिली आहे.

इमरान हाशमीच्या 'मर्डर २' सिनेमात झळकलेल्या अभिनेत्रीने गुडन्यूज दिली आहे. अभिनेत्री सुलग्ना पाणिग्रही लवकरच आई होणार आहे. लग्नानंतर चार वर्षांनी अभिनेत्री सुलग्ना आणि कॉमेडियन बिस्वा कल्याण रथ यांच्या घरी पाळणा हलणार आहे. सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत आईबाबा होणार असल्याची गुडन्यूज त्यांनी चाहत्यांना दिली आहे. 

अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडियावरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती आणि तिचा पती दिसत आहे. व्हिडिओच्या शेवटी अभिनेत्रीने आईबाबा होणार असल्याचं सांगत बेबी बंप फ्लॉन्ट केला आहे. "नव्या पाहुण्याचं आगमन होत आहे...एक तर या आर्थिक वर्षी किंवा पुढच्या आर्थिक वर्षी", असं कॅप्शन तिने व्हिडिओला दिलं आहे. अभिनेत्रीच्या या व्हिडिओवर कमेंट करत चाहते आणि सेलिब्रिटींनी त्यांचं अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. 

सुलग्ना पाणिग्रहीने अनेक टीव्ही मालिका आणि सिनेमांमध्ये काम केलं आहे. 'मर्डर २', 'रेड', 'विजय ६९' या सिनेमांमध्ये ती दिसली होती. तर सुलग्नाचा पती बिस्वा कल्याण रथ एक कॉमेडियन आहे. सुलग्ना आणि बिस्वाने ९ डिसेंबर २०२० रोजी लग्न केलं होतं. आता लग्नानंतर ४ वर्षांनी ते आईबाबा होणार आहेत. 

टॅग्स :सेलिब्रिटीप्रेग्नंसी