Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुन्नाभाई शिकतोय मार्शल आर्ट्स !

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2016 16:31 IST

येरवडा जेलमधून बाहेर आल्यानंतर मुन्नाभाई संजय दत्तनं जास्तीत जास्त वेळ आपल्या कुटुंबीयांसाठी दिलाय. आता मात्र संजूबाबा पुन्हा एकदा कामाला ...

येरवडा जेलमधून बाहेर आल्यानंतर मुन्नाभाई संजय दत्तनं जास्तीत जास्त वेळ आपल्या कुटुंबीयांसाठी दिलाय. आता मात्र संजूबाबा पुन्हा एकदा कामाला लागल्याचं बोललं जातंय. त्यामुळंच की काय संजय दत्तनं आता मार्शल आर्टचे धडे घेण्यास सुरुवात केलीय.खास एनएसजी कमांडोकडून संजूबाबा हे कमांडोचं प्रशिक्षण घेतोय. या ट्रेनिंगसाठी तो बराच घाम गाळतोय. त्यामुळं संजूबाबा आगामी सिनेमात एक्शन करताना दिसल्यास आश्चर्य वाटायला नको.