Join us
Daily Top 2Weekly Top 5

​‘मुन्नाभाई3’ची प्रतीक्षा संपणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2016 13:54 IST

‘मुन्नाभाई एमबीबीएस’ आणि ‘लगे रहो मुन्नाभाई’नंतर सर्वांनाच प्रतीक्षा आहे ती ‘मुन्नाभाई3’ची. संजय दत्त तुरुंगाबाहेर आल्यानंतर ‘मुन्नाभाई3’ची चर्चा चांगलीच रंगलीय. ...

‘मुन्नाभाई एमबीबीएस’ आणि ‘लगे रहो मुन्नाभाई’नंतर सर्वांनाच प्रतीक्षा आहे ती ‘मुन्नाभाई3’ची. संजय दत्त तुरुंगाबाहेर आल्यानंतर ‘मुन्नाभाई3’ची चर्चा चांगलीच रंगलीय. अलीकडे विधू विनोद चोप्रा यांना याबाबत विचारण्यात आले. प्रेक्षकांची प्रतीक्षा लवकरच संपणार, असे संकेत त्यांनी यावेळी दिले. पुढील वर्षी ‘मुन्नाभाई3’ फ्लोरवर येणार असल्याचे त्यांनी सांगितले. मी सध्या या कथेवर काम करतो आहे. पुढील वर्षी हा चित्रपट फ्लोर येणार, असे विधू म्हणाले. फेबु्रवारीमध्ये संजय तुरुंगातून बाहेर आला. मात्र अद्यापही त्याचा कुठलाच चित्रपट रिलीज झालेला नाही. साहजिकच संजयलाच नाही तर संजयच्या चाहत्यांनाही ‘मुन्नाभाई3’सारख्या एका हिटची प्रतीक्षा असणार.‘मुन्नाभाई’ सीरिजचे चित्रपट राजकुमार हिरानी यांनी दिग्दर्शित केले होते. संजयने यात मुरली प्रसाद तर अरशद वारसीने सर्किटची भूमिका साकारली होती. या सीरिजचे दोन्ही चित्रपट लोकांनी डोक्यावर घेतले होते. आता बघुयात ‘मुन्नाभाई3’ कधी येतो आणि किती गाजतो ते!