Join us  

पोर्न रॅकेट प्रकरण: व्हिडीओ कॉलवरच त्यांनी मला...; सागरिकानं सांगितली ट्रॅपची खळबळजनक कहाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2021 5:59 PM

"चित्रपटांत काम शोधण्यासाटी आलेल्या मुलींकडून बोल्ड सीन शूट करण्याच्या नावावर पोर्न फिल्म्समध्ये  काम करून घेतले जाते. मुलिंना 20-30 मिनिटांच्या पोर्न फिल्म्ससाठी पैसे दिले जातात." (actress Sagrika Shona Suman)

ठळक मुद्देलॉकडाउनमुळे उमेश कामतने व्हिडिओ कॉलवरच ऑडिशन द्यायला सांगितले - सागरिकाव्हिडिओ कॉलदरम्यान तीन लोक उपस्थित होते - सागरिकाउमेशने व्हिडिओ कॉलवर नग्न होऊन ऑडिशन द्यायला सांगितले होते - सागरिका

मुंबई - पोर्न रॅकेट (porn racket ) प्रकरणात मुंबई पोलीसच्या प्रॉपर्टी सेलने अभिनेत्री गहना वशिष्टसह 9 जनांना अटक केली आहे. या 9 जणांत उमेश कामत नावाच्या व्यक्तीचाही समावेश आहे. उमेश कामत (Umesh Kamat) प्रसिद्ध उद्दोयजक आणि शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) पती राज कुंद्रासाठी(Raj Kundra)  काम करत होता. आता मुंबईची अ‍ॅक्टर मॉडेल सागरिका शोना सुमन (Sagarika Shona Suman) हिने उमेश कामतवर अत्यंत गंभीर आरोप केले असून या रॅकेटचा सूत्रधार एक प्रसिद्ध उद्योजक असल्याचेही सांगितले आहे. (Mumbai porn racket case actress Sagrika Shona Suman commented on Umesh Kamat)

एबीपी न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, अ‍ॅक्टर मॉडेल सागरिका शोना सुमन हीने म्हटले आहे, की 'उमेश कामतने गेल्या वर्षी ऑगस्ट 2020 मध्ये वेब सीरीजमध्ये काम देण्यासाठी ऑफर दिली होती. लॉकडाउनमुळे उमेश कामतने व्हिडिओ कॉलवरच ऑडिशन द्यायला सांगितले. व्हिडिओ कॉलदरम्यान तीन लोक उपस्थित होते. यांपैकी एकाने आपला चेहरा लपवला होता. उमेशने व्हिडिओ कॉलवर नग्न होऊन ऑडिशन द्यायला सांगितले होते.

मॉडेलने सांगितल्याप्रमाणे, उमेश कामतने सांगितले, की बोल्ड सीन वेब सीरीजची मागणी आहे. व्हिडिओ कॉलवर न्यूड होण्याची डिमांड झाल्यानंतर सागरिकाने तसे करण्यास नकार दिला. एवढेच नाही, तर या अभिनेत्रीने दावा केला आहे, की उमेश कामतने राज कुंद्राच्या फिल्ममध्ये काम करण्याची ऑफर दिली होती. तसेच व्हिडिओ कॉलवर ऑडिशन दरम्यान ज्या व्यक्तीने चेहरा लपवला होता, ती व्यक्ती राज कुंद्रा असू शकते, असेही तिने म्हटले आहे.

चित्रपटांत काम शोधण्यासाटी आलेल्या मुलींकडून बोल्ड सीन शूट करण्याच्या नावावर पोर्न फिल्म्समध्ये  काम करून घेतले जाते. मुलिंना 20-30 मिनिटांच्या पोर्न फिल्म्ससाठी पैसे दिले जातात. उमेश कामतच्या अटकेनंतर हे मोठे रॅकेट असल्याचे समजले, असेही अ‍ॅक्ट्रेस मॉडेल सागरिका शोना सुमनने म्हटले आहे.

अ‍ॅक्टर मॉडेल सागरिका शोना सुमनने राज कुंद्रावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. राज कुंद्राच्या वेगवेगळ्या अ‍ॅडल्ट वेबसाइट्स चालतात. त्या उमेश कामत सांभाळतो, असा दावाही दिने केला आहे.

टॅग्स :बॉलिवूडवेबसीरिजसिनेमापोलिसगुन्हेगारी