Join us
Daily Top 2Weekly Top 5

'शक्तिमान'ला मिळाली अश्लील वेब सीरिजची ऑफर; मुकेश खन्नांनी घेतला 'हा' निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2021 14:12 IST

Mukesh khanna : अलिकडेच त्यांनी वेब सीरिजमध्ये दाखवण्यात येणाऱ्या अश्लील, भडक दृश्यांवर टीका केली होती. मात्र...

ठळक मुद्देअलिकडेच त्यांनी ओटीटी आणि अश्लीलता यांच्याविरोधात मत मांडली होती.

छोट्या पडद्यावरील 'शक्तिमान' या लोकप्रिय कार्यक्रमात झळकलेले अभिनेता मुकेश खन्ना सोशल मीडियावर चांगलेच सक्रीय असतात. त्यामुळे समाजात घडणाऱ्या प्रत्येक घटनेवर ते उघडपणे त्यांचं मत मांडतात. यात बऱ्याचदा ते कलाविश्वातील काही घटनांवरही प्रकाश टाकतात. अलिकडेच त्यांनी वेब सीरिजमध्ये दाखवण्यात येणाऱ्या अश्लील, भडक दृश्यांवर टीका केली होती. मात्र, त्यानंतर त्यांनादेखील अशाच एका अश्लील वेब सीरिजची ऑफर मिळाली. अलिकडेच एका मुलाखतीत त्यांनी याविषयीचा खुलासा केला आहे.

अलिकडेच मुकेश खन्ना यांच्या 'द मुकेश खन्‍ना शो' या कार्यक्रमात अभिनेता करणवीर बोहरा सहभागी झाला होता. यावेळी करणवीरसोबत चर्चा करत असताना मुकेश खन्ना यांनी त्यांना आलेल्या एका वेब सीरिजचा अनुभव शेअर केला. 

वयाच्या तिसऱ्या वर्षी फातिमा शेखवर लैंगिक अत्याचार; 'दंग गर्ल'ने केला धक्कादायक खुलासाएका वेब सीरिज निर्मात्यांनी मला त्यांच्या सीरिजची ऑफर दिली होती. मात्र, यापूर्वी मी ओटीटी आणि अश्लीलता यांच्याविरोधात माझी मत मांडली होती. त्यामुळे या सीरिजसाठी मी नकार दिला. मात्र, या सीरिजच्या निर्मात्यांनी मला गळ घालत सीरीजची स्क्रिप्ट वाचण्याचा आग्रह केला आणि मेलवर स्टोरी पाठवली,असं मुकेश खन्ना म्हणाले.

पुढे ते म्हणतात, "ज्यावेळी मी स्क्रिप्ट वाचायला सुरुवात केली त्याच्या पाचव्याच ओळीमध्ये एक अश्लील सीन होता. एक मसाज करणारी स्त्री आहे आणि ती काही ठराविक कामांमध्ये पटाईत आहे, असं त्या सीनमध्ये होतं. तसंच मला एका मुलीसोबत लग्न करायचं होतं. परंतु, काही कारणास्तव ते लग्न न झाल्यामुळे मी तणावग्रस्त आहे, अशी भूमिका मला ऑफर करण्यात आली होती. त्यामुळे मी या सीरिजसाठी नकार दिला."मुकेश खन्ना यांनी दिलं 'हे' उत्तर

"जर तुम्ही यालाल अश्लील म्हणत नसाल तर मग तुमची अश्लील तेची व्याख्या काय? मी स्पष्टपणे या सीरिजसाठी नकार दिला आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवरही सेंसॉरशीप असावी असं माझं प्रामाणिकपणे मत आहे", असं उत्तर मी या निर्मात्यांना दिलं.

दरम्यान, मुकेश खन्ना सोशल मीडियावर चांगलेच अॅक्टीव्ह आहेत. यापूर्वीदेखील त्यांनी काही व्हिडीओ शेअर करत महत्त्वाच्या मुद्द्यांवर स्पष्टपणे मत नोंदविली आहेत.विशेष म्हणजे कपिल शर्मा शोलादेखील त्यांनी अश्लील आणि वाईट शो म्हटलं होतं. त्यानंतर त्यांनी त्यांचा स्वत:चा 'द मुकेश खन्ना' शो सुरु केला. 

टॅग्स :मुकेश खन्नावेबसीरिज