Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘या’ अभिनेत्यासोबत सायंकाळ घालविण्यासाठी रेखाने सोडला होता ‘हा’ चित्रपट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2017 17:10 IST

फिल्म इंडस्ट्रीमध्ये जेव्हा-जेव्हा अफेअर्सची चर्चा रंगते तेव्हा-तेव्हा महानायक अमिताभ बच्चन आणि रेखा यांची लव्हस्टोरी हमखास चर्चिली जाते. त्याकाळात या ...

फिल्म इंडस्ट्रीमध्ये जेव्हा-जेव्हा अफेअर्सची चर्चा रंगते तेव्हा-तेव्हा महानायक अमिताभ बच्चन आणि रेखा यांची लव्हस्टोरी हमखास चर्चिली जाते. त्याकाळात या दोघांमध्ये असे काही प्रेम रंग बहरले होते की, कोणीही यापासून अनभिज्ञ नव्हते. आज भलेही हे दोघे एकमेकांसोबत नाहीत; मात्र एक काळ असा होता की, रेखा आपल्या प्रियकर अमिताभ बच्चन याच्यासोबत सायंकाळ व्यतित करण्यासाठी चक्क तिच्या शुटिंगचे शेड्यूल्ड बदलत असे. एकदा तर तिने सायंकाळी अमिताभला भेटू देण्यास जाऊ दिले नाही म्हणून दिग्दर्शकांसोबतच पंगा घेतला होता. हे प्रकरण ऐवढे वाढले होते की, अखेर तिने त्या चित्रपटाला गुडबाय केला. ९० च्या दशकातील ही गोष्ट आहे. बॉलिवूडमध्ये खलनायकाची भूमिका साकारण्यास प्रसिद्ध असलेले रंजित त्याकाळी ‘कारनामा’ या चित्रपटाची निर्मिती करीत होते. या चित्रपटासाठी त्यांनी रेखा आणि धर्मेंद्र या जोडीला साइन केले होते. त्याकाळी रेखा आणि अमिताभ त्यांच्यातील अफेअरमुळे चर्चेत होते. रंजित यांनी चित्रपटाच्या शुटिंगचे शेड्यूल्ड सायंकाळचे ठेवले होते. मात्र ही बाब रेखाच्या अजिबातच पचनी पडली नव्हती. मात्र अशातही तिने सुरुवातीला याविषयी काहीच म्हटले नाही. परंतु अमिताभला भेटण्याची व्याकूळतेने रेखाने रंजितला शूटिंगचे शेड्यूल्ड मॉर्निंगला शिफ्ट करण्याचे म्हटले. तसेच सायंकाळची वेळ मी अमिताभसोबत व्यतित करू इच्छिते, असेही तिने स्पष्ट केले. चित्रपटात रेखा लीड रोलमध्ये असल्याने रंजितला तिच्या मागणीचा विचार करावा लागला. याचा खुलासा रंजित यांनीच एका मुलाखतीदरम्यान केला होता. रंजितने म्हटले होते की, रेखाने मला शुटिंगचे शेड्यूल्ड मॉर्निंगला शिफ्ट करण्याची रिक्वेस्ट केली होती. तिला अमिताभसोबत सायंकाळचा वेळ घालवायचा होता. रंजितने रेखाच्या मागणीप्रमाणे शूटिंगचे शेड्यूल्ड बदलण्याचा निर्णय घेतला. मात्र यामुळे धर्मेंद्र यांच्या बाकीच्या प्रोजेक्टचे शेड्यूल्ड बिघडले होते. अखेर रेखाने हा चित्रपट सोडला होता. वास्तविक रंजित या चित्रपटामुळे खूपच अडचणीत सापडला होता. रंजितची ही अडचण सोडविण्यासाठी धर्मेंद्र यांनीच त्याला रेखाऐवजी अनिता राज हिला साइन करण्याचा सल्ला दिला होता. मात्र रंजितने या दोघांनाही सोडचिठ्ठी देत विनोद खन्ना आणि फराह नाज यांना घेऊन या चित्रपटाची निर्मिती केली. परंतु पुढे हा चित्रपट सुपरडूपर फ्लॉप ठरला. त्यावेळी रंजितने अमिताभमुळेच रेखाने हा चित्रपट सोडल्याचा आरोप केला होता.