Join us

सुशांत सिंग राजपूतवर येणार सिनेमा, बॉलिवूडचा होणार पर्दाफाश-जगासमोर येणार खरा चेहरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2020 13:14 IST

सुशांतच्या निधनानंतर बॉलिवूडमधील वातावरण ढवळून निघाले आहे.

अभिनेता सुशांत सिंग राजपूत 14 जूनला जगाचा निरोप घेतला. सुशांतवर सिनेमा तयार करण्यात येणार आहे. फिल्ममेकर सनोज मिश्राने हा सिनेमा तयार करणार आहेत ज्याचे नाव सुशांत असेल. पण हा सिनेमा सुशांतची बायोग्राफी नसणार आहे अशी माहिती सनोज यांनी दिली आहे. या सिनेमात एका स्ट्रग्लिंग अभिनेत्याची गोष्ट दाखवण्यात येणार आहे जो मुंबईत आपली स्वप्न करण्याची इच्छा ठेवतो. 

सनोज यांनी याआधी गांधीगिरी, राम बर्थप्लेस,लंफेंगे नवाब आणि श्रीनगरसारखे सिनेमा तयार केले आहेत. हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टनुसार, सनोज म्हणाले, हा सिनेमा त्याप्रत्येक व्यक्तीवर आधारित आहे ज्यानी बॉलिवूडमधल्या मानसिक त्रासाला टोकाचं पाऊल उचलले.  रोड प्रॉडक्शन आणि सनोज मिश्रा फिल्म्स एकत्र येऊन या सिनेमाची निर्मिती करणार आहेत. मुंबई आणि बिहारमध्ये या सिनेमाचे शूटिंग होईल. 

सनोजशिवाय आणखी एक सिनेमा सुशांत सिंग राजपूतच्या आयुष्यावर तयार करण्यात येणार आहे. फिल्ममेकअर विजय शंकर गुप्ता यांनी यासिनेमाची घोषणा केली आहे. या सिनेमाचे नाव 'सुसाईड या मर्डर?' असे असणार आहे. सुशांतच्या निधनानंतर बॉलिवूडमधील वातावरण ढवळून निघाले आहे तसेच नेपोटिझमचा मुद्द्या चर्चेत आला आहे. करण जोहर, सलमान खान, आलिया भट आणि सोनम कपूर सारख्या अनेक सेलिब्रेटींना लोकांनी सोशल मीडियावर ट्रोल करत आहेत. 

टॅग्स :सुशांत सिंग रजपूत