Join us

रिया चक्रवर्तीवर कोसळला दुःखाचा डोंगर, जवळच्या व्यक्तीचे कोरोनाने झाले निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2021 22:31 IST

रिया चक्रवर्तीच्या जवळच्या व्यक्तीचे निधन झाले असून तिने ही माहिती सोशल मीडियावर दिली आहे.

देशभरात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना दिसतो आहे. यादरम्यान कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसते आहे. तर काहींचा बळीदेखील गेला आहे. दरम्यान बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्तीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिने कोरोनामुळे तिच्या काकांचे निधन झाल्याचे सांगितले आहे. रियाने सोशल मीडियावर तिच्या दिवंगत काकांचा फोटो शेअर करत त्यांच्याबद्दल माहिती दिली आहे.

खरेतर रिया चक्रवर्तीचे काका कर्नल एस. सुरेश कुमार यांचे निधन झाले आहे. याची माहिती तिने सोशल मीडियावर त्यांचा फोटो शेअर करत दिली आहे. रियाने पोस्टमध्ये सांगितले की, सुरेश कुमार यांचा जन्म १० नोव्हेंबर, १९६८ला झाला होता. त्यांनी १ मे, २०२१ ला जगाचा निरोप घेतला.

रियाने फोटो शेअर करत लिहिले की, एक प्रसिद्ध ऑर्थोपेडिक सर्जन, एक सन्मानीय अधिकारी, एक प्रेमळ वडील आणि चांगला माणूस. कोरोनाने तुम्हाला आमच्यापासून हिरावले, मात्र तुमची लिगसी नेहमीच राहिल. सुरेश अंकल, तुम्ही खऱ्या आयुष्यातील हिरो आहात. सर, तुम्हाला माझा सलाम.

रिया चक्रवर्तीने पोस्टच्या अखेरीस चाहत्यांना एक मेसेजही दिला आहे. तिने म्हटलंय की, मी तुम्हाला सर्वांना विनंती करते की तुम्ही सर्व आपल्या घरी रहा आणि सुरक्षित रहा. कोव्हिड चांगले आणि वाईट पाहत नाही.

सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात रिया चक्रवर्तीचे नाव आल्यानंतर ती सोशल मीडियापासून लांब आहे. मात्र हळूहळू ती पुर्ववत आयुष्य जगण्याचा प्रयत्न करते आहे. रिया चक्रवर्तीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर ती चेहरे चित्रपटात दिसणार आहे. यात तिच्यासोबत इमरान हाश्मी, अमिताभ बच्चन, अनु कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाची रिलीज डेट कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आली आहे.

टॅग्स :रिया चक्रवर्तीकोरोना वायरस बातम्यासुशांत सिंग रजपूत