Join us
Daily Top 2Weekly Top 5

आधी अनफॉलो केलं, फोटो डिलीट केले अन् आता...; मौनी रॉयसोबत घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान सूरज नांबियारचा मोठा निर्णय

By कोमल खांबे | Updated: May 12, 2026 15:35 IST

मौनी सोबतचे सगळे फोटो डिलीट केल्यानंतर सूरज नांबियारने सोशल मीडिबाबत मोठा निर्णय घेतला आहे.

अभिनेत्री मौनी रॉय आणि सूरज नांबियार यांच्या संसारात वादळ आलं आहे. मौनी आणि सूरज यांचा चार वर्षांचा संसार मोडल्याच्या चर्चा सुरू आहेत. दोघांनीही एकमेकांना इन्स्टाग्रामवरुन अनफॉलो केलं आहे. तर त्यांनी एकमेकांसोबतचे फोटोही डिलीट केले आहेत. मौनी सोबतचे सगळे फोटो डिलीट केल्यानंतर सूरज नांबियारने सोशल मीडिबाबत मोठा निर्णय घेतला आहे. 

मौनीसोबत घटस्फोटाच्या चर्चा सुरू असतानाच सूरजने त्याचं इन्स्टाग्राम अकाऊंट डिलीट केलं आहे. @nambiar13 या नावाने सूरज नांबियारचं अकाऊंट होतं. मात्र इन्स्टाग्रामवर त्याचं अकाऊंट आता दिसत नाहीये. त्यामुळे त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना आणखीणच उधाण आलं आहे. मात्र, अद्याप मौनी किंवा सूरजने याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मौनीची मैत्रीण दिशा पटानी हिनेदेखील सूरजला अनफॉलो केल्याचं समोर आलं आहे. 

मौनी रॉय आणि सूरज नांबियार यांनी २७ जानेवारी २०२२ रोजी लग्नाच्या बेडीत अडकत नव्या आयुष्याला सुरुवात केली होती. बंगाली आणि मल्याळी अशा दोन्ही परंपरांनुसार त्यांचा विवाहसोहळा गोव्यात पार पडला होता. ज्यामध्ये बॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीतील अनेक दिग्गज सहभागी झाले होते. मौनी आणि सूरज यांची पहिली भेट २०१९ मध्ये दुबईत झाली होती. सुमारे दोन वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला होता. मात्र आता अवघ्या ४ वर्षांतच त्यांचा संसार मोडला आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Mouni Roy divorce rumors: Suraj Nambiar deletes Instagram after unfollowing.

Web Summary : Amidst divorce rumors, Suraj Nambiar deleted his Instagram after Mouni Roy unfollowed him and deleted their photos. The couple married in 2022. Disha Patani also unfollowed Suraj. Neither has commented.
टॅग्स :मौनी राॅयटिव्ही कलाकारघटस्फोट