Join us

आरारारारा खतरनाक! मौनी रॉयने पुनीत पाठकच्या लग्नात लगावले जबरदस्त ठुमके, व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2020 15:39 IST

मौनी रॉयचे हे डान्स करतानाचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. एका व्हिडीओत मौनी केमिला केबेलो आणि शॉन मेंडेसच्या सेनोरिटा गाण्यावर डान्स करताना दिसली.

डान्स इंडिया डान्स आणि डान्स प्लस फेम कोरिओग्राफर-डान्सर पुनीत पाठकने नुकतंच गर्लफ्रेन्ड निधि मूनीसोबत लग्न केलं. या लग्नाला डान्स इंडिया डान्स विजेती शक्ति मोहन, भारती सिंहसोबत अभिनेत्री मौनी रॉयही आली होती. मौनी रॉयने या लग्नात जबरदस्त डान्सही केला. तिचे हे डान्स करतानाचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. एका व्हिडीओत मौनी केमिला केबेलो आणि शॉन मेंडेसच्या सेनोरिटा गाण्यावर डान्स करताना दिसली.

मौनी रॉयचा हा व्हिडीओ वूंपलाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलाय. आतापर्यंत हा व्हिडीओ ७ हजारपेक्षा अधिक लोकांनी पाहिलाय. हा व्हिडीओ पाहून हे दिसतं की, मौनी कशाप्रकारे पुनीत पाठकच्या लग्नात डान्स करत एन्जॉय करत आहे. याच लग्नातील तिचे वेगवेगळे  व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. एका व्हिडीओत ती कजरारे गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.

मौनी रॉयच्या वर्कफ्रंटबाबत सांगायचं तर नुकतीच ती 'लंडन कॉन्फिडेन्शिअल' या वेबसीरीजमध्ये दिसली होती. यातील तिच्या कामाचं कौतुकही करण्यात आलं होतं. मौनीने अक्षय कुमारच्या गोल्डपासून बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली होती. नंतर ती मेड इन चायनामध्ये राजकुमार रावसोबत दिसली. आता ती रणबीर कपूर, आलियासोबत  ब्रम्हास्त्रमध्ये दिसणार आहे.  

टॅग्स :मौनी राॅयबॉलिवूडसोशल व्हायरल