Join us

प्रभास आणि सैफ अली खानच्या 'आदिपुरूष'चे मोशन कॅप्चर झाले सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2021 15:46 IST

ओम राऊतच्या 'आदिपुरूष' चित्रपटात प्रभास राम आणि सैफ अली खान लंकेशच्या भूमिकेत दिसणार आहेत.

अभिनेता प्रभास आणि सैफ अली खानचा आगामी चित्रपट आदिपुरूषची घोषणा झाल्यापासून या चित्रपटाची चर्चा होताना दिसते आहे. ओम राऊतच्या या चित्रपटात प्रभास राम आणि सैफ अली खान लंकेशच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊतने ट्वीटद्वारे मोशन कॅप्चर सुरू झाल्याची माहिती दिली आहे. 

ओम राऊतने फोटो शेअर करून लिहिले की, मोशन कॅप्चर सुरू झाले. आदिपुरुषचे जग तयार करत आहोत. या चित्रपटाचे निर्माते भूषण कुमार म्हणाले, टी-सीरीजमध्ये आम्ही नेहमीच नवीन कल्पना आणि संकल्पनांना प्रोत्साहन देतो. 

ओम आणि त्यांची टीम नवीन तंत्रज्ञानासह आदिपुरुषचे विश्व तयार करीत आहेत. हे तंत्रज्ञान आंतरराष्ट्रीय चित्रपटात वापरले जातात आणि पहिल्यांदाच भारतीय चित्रपटसृष्टीत वापरले जाणार आहे. न्यूज रिपोर्टनुसार आदिपुरुष चित्रपटाची शूटिंग फेब्रुवारीच्या किंवा मार्चच्या सुरूवातीला सुरू होईल. प्रभास त्याच्या आगामी चित्रपटाचे शूटिंग पूर्ण करून आदिपुरुषची सुरूवात करेल, तर सैफ अली खानदेखील मार्चमध्ये चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून या सिनेमातील मुख्य सीतेच्या भूमिकेसाठी वेगवेगळ्या अभिनेत्रींच्या नावांची चर्चा सुरू होती. आता 'मुंबई मिरर' च्या एका रिपोर्टनुसार, आधी सीतेच्या भूमिकेसाठी अनुष्का शेट्टी, अनुष्का शर्मा, कियारा अडवाणी आणि किर्ति सुरेश यांच्या नावाची चर्चा होती. पण आता मीडिया रिपोर्टनुसार या भूमिकेसाठी क्रिती सेननचं नाव फायनल झालं आहे.  हा चित्रपट ११ ऑगस्ट, २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे.

टॅग्स :प्रभाससैफ अली खान